Karisma Kapoor spotted with former husband Sunjay Kapur fans trolls actress
Karisma Kapoor spotted with former husband Sunjay Kapur fans trolls actress sakal
मनोरंजन

Karisma Kapoor: ज्याची निंदा केली त्याच पहिल्या नवऱ्या सोबत फिरतेय करिश्मा कपूर, नेकऱ्यांनी दाखवली जागा..

नीलेश अडसूळ

Karishma Kapoor: बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर ही तिच्या अभिनयाबरोबरच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत राहिलेली आहे. 90 च्या दशकांत या अभिनेत्रीनं आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं होतं.

आजही तिचे चित्रपट चाहते विसरू शकले नाहीत. सध्या ती मनोरंजन क्षेत्रात कार्यरत नसली तरी तिचा मोठा चाहतावर्ग आहे. करिश्माच्या करियर विषयी जेवढी चर्चा झाली, त्याहीपेक्षा चर्चा रंगली ती तिच्या वैयक्तिक आयुष्याची..

करिश्मा कपूर सध्या विभक्त साली असून तिने 2016 मध्येच घटस्फोट घेतला आहे. त्यावेळी तिने नवऱ्यावर अनेक आरोप केले ज्याची मोठी चर्चा झाली. पण तीच करिश्मा आता पहिल्या नवऱ्यासोबत फिरताना दिसली. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलेच धारेवर धरले आहे.

(Karisma Kapoor spotted with former husband Sunjay Kapur fans trolls actress )

करिश्मा कपूरने २००३ मध्ये उद्योगपती संजय कपूरसोबत लग्न केले. जवळपास 13 वर्षे त्यांचे नाते टिकले पण नंतर त्यांचे संबंध हळूहळू बिघडू लागले. त्यांच्यात वाद, भांडणं यामुळे मोठी दरी निर्माण झाली.

त्यावेळी करिश्मा कपूरने संजय कपूरवर मारहाण केल्याचाही आरोप केला होता आणि मग २०१६ मध्ये घटस्फोट घेत ते दोघेही विभक्त झाले. पण नुकतीच ती पुन्हा एकदा आपल्या पहिल्या पतीसोबत म्हणजेच संजय कपूरसोबत डिनर डेटवर गेलेली दिसली. त्यांचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आणि करिश्मावर टीका होऊ लागली.

करिश्मा कपूर आणि संजय कपूर शनिवारी रात्री मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये दिसले यावेळी पापाराझींनी त्यांचा व्हिडिओ काढला आणि शेयर केला. आता हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

आता करिश्मा कपूरवर नेटकऱ्यांनी चांगलेच तोंडसुख घेतले आहे. तिच्या या व्हिडिओवर कमेंटचा अक्षरशः पाऊस पडत आहे. 'घटस्फोट झाला आहे तर मग पुन्हा का भेटते याला' अशी एकाने कमेंट केली आहे. तर 'ज्याच्यावर आरोप केले त्यालाच पुन्हा भेटायला गेली' असेही काहींनी म्हंटले आहे. तर काहींनी करिश्माला तिने तिच्या पतीवर लावलेल्या आरोपांची आठवण करून दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar hoarding: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

Swati Maliwal: स्वाती मालिवाल प्रकरण तापणार; दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल

'जिरेटोप देणाऱ्याला डोकं नाही अन् घालून घेणाऱ्यालाही डोकं नाही'; उद्धव ठाकरेंचा भर पावसात हल्लाबोल

CM Eknath Shinde : त्यांच्यासोबत पाकिस्तानची बोली बोलणारे बसतात; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

Latest Marathi News Live Update : कोकणातील खेड मध्ये गारा पडल्या

SCROLL FOR NEXT