kartik aaryan esakal
मनोरंजन

Aashiqui 3 : कार्तिक आर्यननं 'आशिकी ३' चं टायटल बदललं! नवीन नाव आहे तरी काय?

कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचं नाव बदल्याच्या चर्चा आता (Aashiqui 3) सुरु झाल्या आहेत.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

kartik aaryan new film aashiqui 3 : बॉलीवूडमध्ये सध्याच्या घडीला सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता म्हणून कार्तिक आर्यनचं नाव घेतलं जात. गेल्या वर्षीपासून त्यानं आपल्या नावाची वेगळी ओळख तयार केली आहे. अशातच त्याच्या आशिकी ३ (kartik aaryan new film aashiqui 3 News) नावाच्या प्रोजेक्टची चर्चा सुरु झाली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कार्तिक आर्यनच्या आशिकी ३ नावाच्या प्रोजेक्टचे नाव बदलल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चांना ( kartik aaryan new film)उधाण आल्याचे दिसत आहे. त्यात कार्तिक आर्यननं नवं नावही त्या प्रोजेक्टला दिले आहे. दुसरीकडे मेकर्स अजुनही वेगळ्या नावाचा विचार करत असल्याची चर्चा आहे.

आशिकी ३ मुळे कार्तिक आर्यन हा चर्चेत आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांना त्याच्या या प्रोजेक्टचे वेध लागले आहे. गेलं वर्षे कार्तिकला चांगलं लाभलं होतं. त्याच्या सत्यप्रेम की कथा, भुलभलैय्या या चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता त्याच्या आगामी आशिकी ३ विषयी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

आशिकी ३ च्या ऐवजी तू आशिकी है असं नाव त्या प्रोजेक्टला दिल्याचे सांगण्यात येत आहे. अर्थात निर्मात्यांच्या वतीनं अद्याप कोणत्याही प्रकारची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र ते नाव बदलण्याची प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरु असल्याचे सांगण्यात येत होते. त्यावर आता शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे.

आशिकी ३ ही भट्ट कँपमधील फिल्म असून त्याचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग बसू करणार आहे. आशिकी ३ ही २०२४ मधील एक बहुप्रतिक्षित फिल्म असल्याची चर्चा आहे. त्यात कार्तिक हा प्रमुख भूमिकेत असून त्याच्या अपोझिट सारा अली खान दिसणार आहे. अशी चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT