Kartik Aaryan Awarded in Australia  esakal
मनोरंजन

Karthik Aaryan : ऑस्ट्रेलियन सरकार करणार कार्तिक आर्यनचा गौरव! काय आहे कारण?

काही दिवसांपूर्वी कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा सत्य प्रेम की कथा नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

युगंधर ताजणे

Kartik Aaryan Awarded in Australia - प्यार का पंचनामापासून कार्तिक आर्यनची झालेली सुरुवात आता त्याला यशाच्या शिखरावर घेऊन गेली आहे. तो एक तारांकित अभिनेता झाला आहे. त्याच्या शब्दाला वजन आले आहे. प्रख्यात सेलिब्रेटी झाला आहे. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अशा कार्तिकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

काही दिवसांपूर्वी कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा सत्य प्रेम की कथा नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. समीर विद्वंवस दिग्दर्शित या चित्रपटानं चांगली कमाई केली आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं शंभर कोटींपेक्षा जास्त कमाई केल्याची आकडेवारी समोर आली आहे. यानंतर येत्या काळात कार्तिकचे मोठे प्रोजेक्ट चाहत्यांचे लक्ष वेधून घेणार आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

कार्तिकनं गेल्या वर्षांपासून त्याचा फॉरमॅट चेंज केल्याचे दिसून येत आहे. तो आता विनोदी आणि हलक्या फुलक्या विषयांवरील चित्रपटांकडे जास्त लक्ष केंद्रित करत असल्याचे दिसून आले आहे. कार्तिकच्या चित्रपटांचा चाहतावर्ग वेगळा आहे. त्यामुळे नव्या विषयाच्या चित्रपटांना प्रेक्षकांसमोर घेऊन येणाऱ्या कार्तिकच्या कलाकृतींना मोठी दाद मिळताना दिसते. आता कार्तिकच्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी आहे. ती म्हणजे कार्तिकचा जागतिक पातळीवर होणारा गौरव.

फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यानं दिलेल्या महत्वपूर्ण योगदानासाठी त्याला मेलबर्नमधील इंडियन फिल्म फेस्टिव्हल मध्ये गौरविण्यात येणार आहे.आयएफएफएम कडून हा गौरव होणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. बॉलीवूडमधील सध्याच्या घडीला लिस्ट ए मधील कलाकारांमध्ये कार्तिक आर्यनचे नाव घेतले जाते. कार्तिकला आता रायझिंग ग्लोबल सुपरायझर स्टार ऑफ इंडियन सिनेमा या पुरस्कारानं गौरविण्यात येणार आहे.

व्हिक्टोरिया सरकारकडून पुढील महिन्यात अकरा तारखेला या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. बॉलीवूडपटांचे प्रसिद्ध समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विटद्वारे ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. त्या पोस्टला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT