Kartik Aaryan, Anurag Basu team up for Aashiqui 3. Watch musical poster sakal
मनोरंजन

Aashiqui 3: 'आशिकी 3' मध्ये दिसणार कार्तिक आर्यन, दमदार टीझर प्रदर्शित..

सध्या अभिनेता कार्तिक आर्यनची बरीच हवा आहे.

नीलेश अडसूळ

kartik aaryan : १९९० मध्ये आलेला आशिकी ,२०१३ मध्ये आशिकी २ हे दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. आता प्रेक्षकांच्या ट्रिपल मनोरंजनासाठी येत आहे 'आशिकी ३'. या चित्रपटात प्रमुख भूमिका कोण करणार याची उत्सुकता सर्वांना होती. आज अखेर त्याचा उलगडा झाला आहे. 'आशिकी ३' मध्ये कार्तिक आर्यन प्रमुख भूमिकेत असणार आहे. (Kartik Aaryan, Anurag Basu team up for Aashiqui 3. Watch musical poster)

कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया २ ' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला . यानंतर एकापाठोपाठ एक चित्रपट त्याच्या वाट्याला येत आहेत. काही दिवसांपूर्वी, अभिनेत्री क्रिती सेननसोबत 'शेहजादा' या चित्रपटाच्याच्या शूटिंगमध्ये तो व्यस्त होता. त्याचबरोबर त्याने कियारा अडवाणीसोबत 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाचे शूटिंगही सुरू केले आहे. आता आणखी एक दर्जेदार चित्रपट त्याच्या नावावर नोंद झाला आहे.

'आशिकी ३' बाबत हा मोठा खुलासा नुकताच सोशल मिडियावर करण्यात आला. आशिकी ३ मध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पण या चित्रपटात कोणती अभिनेत्री प्रमुख भूमिकेत असणार हे अद्याप उघड झालेले नाही. 'आशिकी 3' चे दिग्दर्शन अनुराग बासू करणार आहेत. आशिकी ३ बद्दल कार्तिक आर्यन म्हणतो, 'आशिकी हा असा चित्रपट आहे, जो पाहत मी मोठा झालो आहे. आशिकी ३ मध्ये काम करणे हे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे. भूषण कुमार आणि मुकेश भट्ट यांच्यासोबत काम करण्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. अनुराग बासू यांच्या कामाचा मी खूप मोठा चाहता आहे आणि त्यांच्यासोबत काम करताना मला खूप काही शिकायला मिळेल.'

अनुराग बासूनेही आशिकी ३ बद्दल आनंद व्यक्त केला आहे. तो म्हणाला की आशिकी आणि आशिकी २ साठी चाहत्यांच्या भावना आजही त्यांच्या हृदयात आहेत. कार्तिक आर्यन सोबतचा हा माझा पहिला प्रोजेक्ट असेल जो त्याच्या कामासाठी समर्पण, मेहनत, संयम आणि दृढनिश्चय यासाठी ओळखला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT