Kartik Aaryan esakal
मनोरंजन

Kartik Aaryan: कार्तिक आर्यनचं स्वप्न झालं साकार; खरेदी केली आलिशान कार,किती आहे किंमत?

Kartik Aaryan's New Range Rover SV : कार्तिकनं त्याच्या ड्रीम कारचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

priyanka kulkarni

Kartik Aaryan: अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. कार्तिकला विविध गाड्यांची देखील आवड आहे. कार्तिकनं लग्झरी गाड्यांचे कलेक्शन केले आहे. आता त्याच्या गाड्यांच्या कलेक्शनमध्ये आणखी एका आलिशान गाडीचा समावेश झाला आहे. त्यानं नुकतीच एक आलिशान गाडी खरेदी केली आहे. कार्तिकनं त्याच्या ड्रीम कारचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

कार्तिकनं खरेदी केली Range Rover SV

कार्तिकनं एक आलिशान कार खरेदी केली आहे. त्यानं Range Rover SV ही गाडी खरेदी केली आहे. कार्तिकनं गुरुवारी त्याच्या या नव्या गाडीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये कार्तिकसोबत 'कटोरी' हा त्याचा पेट दिसला. कार्तिकनं त्याच्या नव्या कारचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "हमारी रेंज थोड़ी सी बढ़ गई है।" कार्तिकनं शेअर केलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.

कारची किंमत किती? (Kartik Aaryan Buys a New Car)

कार्तिकनं खरेदी केलेल्या कारची किंमत सहा कोटी आहे. कार्तिककडे अनेक लग्झरी गाड्यांचे कलेक्शन आहे. त्याच्याकडे BMW 5 Series 520d, McLaren GT, Mini Cooper S, Lamborghini Urus Capsule आणि Porsche 718 Boxster यासह अनेक आलिशान कार आहेत.

कार्तिकचे आगामी चित्रपट

कार्तिकचा भूल भुलैया 3 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं कध्या शुटिंग सुरु आहेत. भूल भुलैया 3 या चित्रपटामध्ये तृप्ती दिमरी देखील काम करणार आहे. हा चित्रपट यावर्षी दिवळीत रिलीज होणार आहे, असं म्हटलं जात आहे. याशिवाय कार्तिक लवकरच चंदू चॅम्पियन या चित्रपटामध्ये देखील दिसणार आहे. तसेच तो आशिकी-3 या चित्रपटात देखील काम करणार आहे, असं म्हटलं जात आहे.

कार्तिकच्या भूल भुलैया-2 या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. या सिनेमात कार्तिकसोबतच कियारा अडवाणी, तब्बू आणि राजपाल यादव यांनी देखील काम केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Income Tax law : १ एप्रिल २०२६ पासून मोदी सरकार तुमच्या फोनमधील मेसेज चेक करणार? नव्या Income Tax कायद्यामागचं सत्य काय?

Leopard: शिकार केलेल्या ठिकाणी बिबट्या पुन्हा-पुन्हा का येतो? माणसाने कोणती काळजी घेतली पाहिजे?

Latest Marathi News Live Update : वाहन चालकाला डुलकी लागल्याने समृद्धी महामार्गावर अपघात, महिला जखमी

Shashikant Shinde : पक्षाचे हित महत्त्वाचे; सन्मानजनक प्रस्तावासह दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर निर्णय होईल- शशिकांत शिंदे!

Pune Police Rescue : बाणेरमधील लॉजवर पोलिसांची धडक; महिलांची सुटका; व्यवस्थापकासह चार आरोपी अटकेत!

SCROLL FOR NEXT