Kartik Aaryan Exclusive chat with Sakal Digital, reveal about his 'dreamgirl' Instagram
मनोरंजन

Exclusive: 'माझी होणारी 'सौ' अशीच हवी'; कार्तिकनं जाहिर केली गुणांची यादी

कार्तिक आर्यननं 'भूलभूलैय्या २' ला बॉक्सऑफिसवर मिळालेल्या यशानंतर सकाळ डिजिटलसोबत दिलखुलास संवाद साधला आहे.

प्रणाली मोरे

बॉलीवूडमध्ये सध्या कार्तिक आर्यन(Kartik Aaryan) हे नाव जोरदार चर्चेत आहे. निमित्त आहे त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला 'भूलभूलैय्या २'(Bhoolbhulaiyaa2) सिनेमा. या सिनेमाला प्रदर्शनानंतर प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला अन् केवळ सहा दिवसाच्या अंतरानं कार्तिक आर्यनचा 'भूलभूलैय्या २' सिनेमा १०० करोडच्या क्लबमध्ये सामिल झाला. या निमित्तानं आम्ही 'भूलभूलैय्या २' सिनेमाचे दिग्दर्शक अनिस बझ्मी आणि अभिनेता कार्तिक आर्यन याच्याशी दिलखुलास संवाद साधला. असं म्हणतात कार्तिक आपल्या मुलाखतीत काही ना काही विशेष बोलून जातो ज्याची जोरदार बातमी होते. सकाळ डिजिटलला(Sakal Digital) दिलेल्या मुलाखतीत कार्तिकनं अशाच आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी देखील अनेक खुलासे करताना थेट लग्नासाठी कशी मुलगी त्याला हवी आहे याविषयी सांगितलं आहे. आता त्या मुलीचं वर्णन थेट कार्तिकच्या तोंडून ऐकण्यासाठी खाली मुलाखतीची लिंक जोडली आहे ती नक्की पहा.

कार्तिक आर्यननं या मुलाखतीत आपल्या ट्रोलर्सविषयी आपलं मत इतक्या गोड पद्धतीनं व्यक्त केलंय की ते ऐकून आपणही म्हणाल कोणी आपल्या डोक्यावर इतका थंड बर्फ ठेवून स्वतःला कसं शांत ठेवू शकतो. कार्तिकनं या मुलाखतीत मराठी भाषेशी आपलं नेमकं जवळचं कसं नात आहे हे कनेक्शन देखील सांगितलं आहे. आणि शुद्ध मराठीत बोलला देखील आहे. ''मराठी बोलता येतं पण चुकून एखादा शब्द वेगळा बोललो तर मग... ''काय म्हणालाय कार्तिक,त्याचा ह्युमर ऐकायला नक्कीच ही मुलाखत ऐका.

याच मुलाखतीत दिग्दर्शक अनिस बझ्मी यांनी देखील कार्तिकचे सेटवरचे अनेक मजेदार किस्से शेअर केलेयत. इतकेच नाही तर कार्तिकच्या आई-वडीलांच्या मनात कार्तिकच्या लग्नाला घेऊन नेमके काय विचार आहेत,त्यांना सून कशी हवी आहे याविषयी देखील खुलासा केला आहे. तेव्हा सकाळ डिजिटलला कार्तिक आर्यनने दिलेली ही Exclusive मुलाखत ऐकायला विसरु नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT