Kartik Aaryan film shehzada alleged copy of allu arjun south movie  Gogle
मनोरंजन

Kartik Aaryan च्या 'शहजादा' मध्ये नवीन काहीच नाही.. साऊथच्या 'या' सिनेमाला अगदी जसंच्या तसं केलंय कॉपी

अनेक बड्या सिनेमांचा गाजावाजा सुरु असला तरी कार्तिक आर्यनचा शहजादा अनेक चांगल्या-वाईट कारणांनी जोरदार चर्चेत आहे.

प्रणाली मोरे

Shehzada Official Remake: कार्तिक आर्यनच्या 'शेहजादा' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे आणि ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या आहेत. जिथे एकीकडे काही लोकांना हा ट्रेलर खूप आवडला आहे तर दुसरीकडे, अनेक लोक दावा करत आहेत की हा साऊथमधील सुपरहिट चित्रपटाची संपूर्ण कॉपी आहे.(Kartik Aaryan film shehzada alleged copy of allu arjun south movie )

कार्तिक आर्यनच्या 'शेहजादा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. आणि पुन्हा एकदा साऊथ चित्रपटाची कॉपी बॉलिवूडमध्ये केलं गेल्याची चर्चा रंगली आहे. शेहजादा चित्रपट साऊथचा सुपर स्टार अल्लू अर्जुनच्या आला वैकुंठप्रेमुलू चित्रपटाची हूबेहूब कॉपी आहे.

कार्तिक आर्यनच्या शेहजादा या चित्रपटाची कथा अशी आहे की मध्यमवर्गीय जीवन जगणाऱ्या एका मुलाला एक दिवस कळते की तो खरंच एक राजकुमार आहे. अशीच काहीशी कथा अल्लू अर्जुनच्या 'आला वैकुंठप्रेमी' चित्रपटाची होती.

शहजादा मधील हिरोईन क्रिती सेनन आहे, तर अल्लू अर्जुनच्या चित्रपटात पूजा हेगडे होती.अभिनेता परेश रावल 'शहजादा'मध्ये कार्तिक आर्यनच्या वडिलांची भूमिका साकारताना दिसत आहे, तर आला वैकुंठप्रेमुलूमध्ये ही भूमिका अभिनेता मुरली शर्माने साकारली होती. तर आला वैकुंठप्रेमुलूमध्ये आईची भूमिका तब्बूने केली होती तर शहजादा मध्ये मनिषा कोईरालानै केली आहे.

इतकेच नव्हेतर या चित्रपटातील कार्तिक आर्यनचे बरेचसे लुक्स आणि ट्रेलरमध्ये दाखवलेले दृश्य अल्लू अर्जुनच्या चित्रपटाशी जुळतात.

'आला वैकुंठप्रेमी' पेक्षा 'शहजादा' वेगळा बनवण्यासाठी अनेक सीन्स खूप वेगळे ठेवण्यात आले आहेत पण महत्त्वाचे सीन जवळपास जुन्या चित्रपटाचीच कॉपी वाटत‌ आहेत असं अनेकजण बोलताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT