When Kartik Aaryan shocked internet and revealed his mom controls esakal
मनोरंजन

Kartik Aaryan About Finance : 'आई मला काही खर्चच करु देत नव्हती, तिनं स्पष्टपणे सांगितलं होतं...'

सध्याच्या घडीला बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन हा त्याच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे.

युगंधर ताजणे

When Kartik Aaryan shocked internet and revealed his mom controls : सध्याच्या घडीला बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन हा त्याच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे. त्यात तिनं त्याच्या फायनान्स आणि बजेटविषयीच्या अनेक गोष्टी शेयर केल्या आहेत.

कार्तिकनं त्याला लहानपणी जो पॉकेटमनी मिळायचा त्यावर आईचा कसा वॉच असायचा, त्यावर तिनं कोणत्या गोष्टी सांगितल्या होत्या, आणि भविष्यात कशाप्रकारे पैसा वाचविणे गरजेचे आहे याचे धडे तिनं आपल्याला पॉकेटमनी देताना कसा दिला होता.याविषयी कार्तिकनं त्या मुलाखतीतून सांगितले आहे. सत्यप्रेम की कथा मधील अभिनेता कार्तिकनं त्याच्या पर्सनल फायनान्सविषयी सांगितलेल्या त्या गोष्टी चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे.

कार्तिकच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास तो आशिकी ३ आणि चंदु चॅम्पियनमध्ये दिसणार आहे. यावेळी त्यानं त्याच्या चंदु चॅम्पियनच्या निमित्तानं सांगितलं आहे की, मला आईनं नेहमीच खर्चात कशी काटकसर करायची याविषयी धडे दिले. तिनं मला महिन्याचे एक बजेट आखून दिले होते. यावेळी तिनं कोणत्या गोष्टीत खर्च करायचा, कोणत्या गोष्टीत नाही हेही सांगितले होते.

तिनं मला कधीही वायफळ खर्च करण्यास प्रोत्साहन दिले नाही. त्यासाठी पैसेही दिले नाही. त्यामुळे मी माझ्या आयुष्यात नेहमीच गुंतवणूक करण्यास भर दिला. त्याचा मला फायदाच झाला. मी जर माझ्या मनाप्रमाणे वागलो असतो तर मला जी अर्थसाक्षरता माहिती झाली त्यासोबत मी परिचित झालो नसतो. आईला नेहमी माझ्या पैसे खर्च करण्याविषयी वाटायचे की, मी वेगवेगळ्या आयडिया वापरुन पैसे खर्च करावेत.

आई मला जो पॉकेटमनी देत असे तो मला तसाच ठेवायला सांगायची. तो खर्च करायचा नाही. आणि तो पॉकेटमनी ती नेहमीच तपासून पाहत असे. अशी आठवणही कार्तिकनं त्या मुलाखतीमध्ये सांगितली आहे. कार्तिकनं त्याचं सांगितलेलं बजेट आणि फायनान्सची गोष्ट सध्या सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय होताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT