kartiki gaikwad and savani ravindra sakal
मनोरंजन

दिल, दोस्ती : मैत्रिणी नव्हे, बहिणीच!

दोन मैत्रिणींचं नातं हे बऱ्याचदा दोन बहिणींसारखं असतं. कधी त्या मैत्रिणी बनून एकमेकींची चेष्टा मस्करी करतात, तर कधी बहीण होऊन एकमेकींची काळजी घेतात, एकमेकींना पाठिंबा देतात.

सकाळ वृत्तसेवा

दोन मैत्रिणींचं नातं हे बऱ्याचदा दोन बहिणींसारखं असतं. कधी त्या मैत्रिणी बनून एकमेकींची चेष्टा मस्करी करतात, तर कधी बहीण होऊन एकमेकींची काळजी घेतात, एकमेकींना पाठिंबा देतात.

- कार्तिकी गायकवाड, सावनी रवींद्र

दोन मैत्रिणींचं नातं हे बऱ्याचदा दोन बहिणींसारखं असतं. कधी त्या मैत्रिणी बनून एकमेकींची चेष्टा मस्करी करतात, तर कधी बहीण होऊन एकमेकींची काळजी घेतात, एकमेकींना पाठिंबा देतात. गायिका कार्तिकी गायकवाड व सावनी रवींद्र यांचं नातं अगदी असं आहे. दोघीही ‘सारेगमप’च्या वेगवेगळ्या पर्वांमधून आपल्यासमोर आल्या. बऱ्याच वर्षांची त्यांची ओळख आहे.

सावनी कार्तिकीबद्दल म्हणाली, ‘मला बहीण नाही. त्यामुळे कार्तिकी ही मला माझ्या लहान बहिणीसारखी आहे. तिचे लाड करणं, कौतुक करणं, तिच्याशी वागणं-बोलणं हे सगळं ती माझी धाकटी बहीण आहे, असं समजूनच माझ्याकडून होतं. ती तिच्या वयाच्या मानानं खूप समजूतदार आहे. तिला लहानपणापासून संत साहित्याचा पाया लाभला आहे आणि तो तिनं उत्तमप्रकारे आत्मसातही केला आहे. ती अत्यंत विचारी आणि फार हळवी आहे. अशा स्वभावामधल्या अनेक गोष्टी आमच्यासारख्या आहेत. आम्हा दोघींनाही पटकन रडू येतं, तसंच एकत्र असलो की काही ना काही विनोद करून आम्ही दोघीही सारख्या हसत असतो. अनेकदा मी स्वतःला तिच्यात बघते. कामाच्या बाबतीतली तिची एकाग्रता, तिचा रियाज, तिची मेहनत ही कौतुकास्पद आहे.

तिनं गायलेले सगळे अभंग व तिनं गायलेलं ‘सुख म्हणजे नक्की काय असतं!’ या मालिकेचं शीर्षकगीत मला फार आवडतं. एक गायिका म्हणून ती उत्कृष्ट आहेच, पण त्यापलीकडं एक माणूस म्हणून ती खूप चांगली आहे. तिच्या लग्नाच्या संगीतला ‘मी गोऱ्या गोऱ्या गालावरी’ हे गाणं गायले होते आणि त्यावेळी कार्तिकीनं येऊन मला घट्ट मिठी मारली. आम्हा दोघींसाठी तो खूप भावनिक क्षण होता. ती कोणतीही गोष्ट मनात ठेवत नाही. तिनं दिलेली दादही खूप मनापासून असते. एकत्र असल्यावर आम्ही भरपूर धमाल करतो. एकत्र शॉपिंग करणं, वेगवेगळे पदार्थ खाऊन बघणं हा आम्हा दोघींचाही जिव्हाळ्याचा विषय. देशात, परदेशात आम्ही कार्यक्रमांच्या निमित्तानं अनेक दौरे एकत्र केले. प्रत्येक दौऱ्यात आमची व्यवस्था वेगवेगळ्या खोल्यांमध्ये केली असली तरी आम्ही आयोजकांना सांगून ती एकाच खोलीत करून घेतो. कुठंही गेलो तरी आम्ही एक कुटुंब बनून राहतो.’

कार्तिकीनं सावनीबद्दल बोलताना सांगितलं, ‘आम्ही बऱ्याच वर्षांपासून एकमेकींना ओळखत होतो, पण आमच्यात घट्ट बॉण्डिंग झालं ते आम्ही अबूधाबीला एका कार्यक्रमासाठी गेलो तेव्हा. त्यावेळी आम्ही एकत्र फिरलो, एकत्रच राहिलो. आम्हा दोघींनाही घरून लाभलेला संगीताचा वारसा, करिअर, लग्न अशा विविध गोष्टींवरून आमच्यात बोलणं झालं. आमच्या गप्पा इतक्या रंगल्या की कधी पहाट झाली आम्हाला कळलंही नाही. काही दिवसांतच तिचं लग्न ठरलं असल्याचं सांगायलाही तिनं मला फोन केला. तिच्या लग्नाचं संगीत, लग्न या दोन्ही कार्यक्रमांना मी आवर्जून गेले होते. तिचा स्वभावही फार गोड आणि बोलका आहे. तितकीच ती मिश्कीलही आहे.

तिला सगळ्या गोष्टी माहीत असतात. त्यामुळं आपण तिला काहीही विचारलं, की तिच्याकडं त्याचं उत्तर हे असतंच. सावनी एक बहुगुणी कलाकार आहे. सतत काही ना काही नवीन प्रयोग ती करत असते. तिनं स्वतःला गाण्याच्या एकाच प्रकारापुरतं मर्यादित ठेवलेलं नाही. तसंच, तिचं घर आणि करिअर या दोन्ही गोष्टी ती फार सुंदरपणे सांभाळते. एक सहकलाकार म्हणूनही ती उत्तम आहे, खूप समजूतदार आहे. सगळ्यांना ती सांभाळून घेते. तिला जर एखादी गोष्ट आवडली तर ती मनमोकळेपणं त्या व्यक्तीचं कौतुक करते. तिनं आतापर्यंत गायलेली सगळीच गाणी ही वेगवेगळ्या शैलीची आहेत. त्यातून तिनं गायलेलं ‘नाही कळले कधी’ हे गाणं मला विशेष आवडतं. आम्हा दोघींचं नातं हे आता मैत्रीचं राहिलेलं नाही. ती माझी मोठी बहीणच आहे. आम्ही आता एकमेकींच्या कुटुंबाचाच भाग झालो आहोत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना, काही जण अडकल्याची भीती; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Nagpur Leopard Rescue : इंजेक्शन मारलं अन् जाळीत पकडलं; भरवस्तीत शिरलेला बिबट्या जेरबंद, रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक घटनाक्रम

Kitchen Hacks: हिवाळ्यात सहज सेट होईल मलाईदार दही; जाणून घ्या एकदम सोपा घरेलू उपाय

Stree Mukti Parishad : स्वातंत्र्याचा वारसा सांभाळणे काळाची गरज; धार्मिक बंधनेच महिलांवरील अत्याचारांचे मूळ: लीलाताई चितळे

फक्त दीड लाख लोकसंख्या असलेला देश फीफा वर्ल्डकपसाठी पात्र; प्रशिक्षकाच्या अनुपस्थितीत घडवला इतिहास

SCROLL FOR NEXT