Karwa Chauth 2022 esakal
मनोरंजन

Karwa Chauth: 'आता उपवास सोडते रे...' धनश्रीचा चहलला व्हिडिओ कॉल, डिजिटल करवा चौथ!

धनश्रीनं साता समुद्रापार असलेल्या युजवेंद्रला व्हिडिओ कॉल करुन करवा चौथच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Karwa Chauth 2022: देशात सध्या सगळीकडे करवा चौथ मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये हा सण तितक्याच निराळ्या पद्धतीनं साजरा होत असतो. भारतीय क्रिकेट संघातही करवा चौथचा फिव्हर दिसून आला आहे. आगामी टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात आहे. यासगळ्यात प्रसिद्ध भारतीय गोलंदाज युजवेंद्र चहलचा करवा चौथ सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्याची पत्नी धनश्री वर्मानं शेयर केलेल्या त्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे.

आता सगळं काही डिजिटल होत असताना सण- उत्सव देखील त्या डिजीटल माध्यमातून साजरे होताना दिसतात. करवा चौथही त्याला अपवाद नाही. धनश्रीनं साता समुद्रापार असलेल्या युजवेंद्रला व्हिडिओ कॉल करुन करवा चौथच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया भन्नाट आहेत. धनश्रीनं व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून युजचा चेहरा पाहून आपण उपवास सोडत असल्याचे सांगितले आहे.

धनश्री ही एक युट्युबर आणि कोरिओग्राफर आहे. तिनं तो व्हिडिओ शेयर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, भारत आणि ऑस्ट्रेलियावाला करवा चौथ असं नाव तिनं दिलं आहे. यापूर्वी युजनं पत्नीसाठी करवा चौथच्या शुभेच्छा देणारी एक पोस्ट शेयर केली होती. त्यात त्यानं लिहिलं होतं की, हॅप्पी करवा चौथ, धनश्री तुला या सणाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. याशिवाय यावेळी युजनं दिलेलं फ्लाईंग किस हे त्याच्या चाहत्यांच्या विशेष चर्चेचा विषय होता.

2020 मध्ये युजवेंद्र आणि धनश्री वर्माचं लग्न झालं. धनश्री ही डॉक्टर आहे. मात्र तिची आवड कोरिओग्राफी असल्यानं तिनं सोशल मीडियावर युट्युब चॅनल सुरु केलं आहे. ज्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT