Karwa Chauth 2023 Esakal
मनोरंजन

Karwa Chauth 2023: श्रद्धा ते पंखुरी! टीव्ही अभिनेत्रींनी शेयर केली करवा चौथची खास झलक!

Vaishali Patil

करवा चौथ हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला हे व्रत करतात. आज सर्वत्र करवा चौथ साजरा केला होत आहे. सामान्यापासून तर बॉलिवूड आणि टिव्ही विश्वातील अभिनेत्रीही आपल्या पतीसाठी हा उपवास करतात. अशातच आता अभिनेत्रींनी आपल्या करवा चौथ सेलिब्रेशनची काही झलक सोशल मिडियावर शेयर केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी ही देखील लग्नानंतर तिच्या पहिल्या करवा चौथसाठी खुपच उत्सुक आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर दिल्लीतील तिच्या सासरच्या घरी करवा चौथच्या तयारीची झलक शेअर केली आहे. तिने तिच्या हाताचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यावर मेंहदीसह स्टार डिझाइन केले आहे.

तर टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींनीही त्यांच्या सरगी आणि मेहेंदीचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर ही दुसऱ्या लग्नानंतर पती निखिलसाठी पहिला करवा चौथ उपवास करणार आहे. दलजीतने एक व्लॉग शेअर केला ज्यात ती नैरोबीमध्ये पहिला करवा चौथ साजरा करण्याच्या उत्साहाबाबत चाहत्यांसोबत बोलली.

तर अभिनेत्री श्रद्धा आर्यने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिच्या मेहेंदीची फोटो शेअर केले त्यासोबत तिच्या नवीन घराची झलकही दाखवली. श्रद्धा तिच्या दुसऱ्या करवा चौथसाठी खूप उत्सुक आहे. श्रद्धाने लिहिले, उत्सव सुरू झाला आहे.

तर अभिनेत्री किश्वरने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर लाल रंगात सजलेल्या तिच्या सरगीचा फोटो शेअर केला. यासोबतच किश्वरने तिच्या मेहेंदीची एक मजेदार रील देखील शेअर केली आहे

कुंडली भाग्य फेम संजय गगनानीची पत्नी पूनमप्रीतने तिच्या मेहेंदीची एक झलक दाखवली तिने तिच्या हातावर संजयचे नाव लिहिले आहे. पूनम देखील करवा चौथसाठी खुप उत्सुक आहे.

तर दुसरीकडे जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर पंखुरी अवस्थी तिचा पहिला करवा चौथ साजरा करत आहे. तिने तिच्या मेहेंदीची एक झलक शेअर केली आहे. ज्यात ती निळ्या रंगाच्या अनाकरली ड्रेसमध्ये दिसत आहे.

अभिनेत्री छवीने देखील करवा चौथसाठी तिच्या सुंदर मेहेंदी डिझाइनसह करवा चौथ व्हाइब्स दाखवल्या आहेत. या खास दिवसाची तयारी तिने सरु केली आहे.

यात छवीने लिहिले, मी करवा चौथची तयारी करत आहे. मला आशा आहे की मी दरवर्षीप्रमाणे उपवास ठेवू शकेन.

तर अभिनेत्री संभावनाने तिच्या व्लॉगमध्ये करवा चौथची तयारी तिच्या चाहत्यांना दाखवली. आता चाहते या अभिनेत्रींच्या करवा चौथ सेलिब्रेशनच्या लूकचे आणि उत्सावाचे फोटो आणि व्हिडिओ पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजित पवार बोलतात, माझं काम बोलतं, १५ तारखेनंतर ते बोलणार नाहीत : मुख्यमंत्री फडणवीस

Somnath Temple: सोमनाथ मंदिरावर 1000 वर्षांनंतर असा प्रकाश आणि भव्यता पाहिली नाहीत, पाहा पीएम मोदींचा मंत्रजप व्हिडिओ

Pune Municipal Election : प्रचारातील भोंग्यांमुळे कानाला दडे! नागरिकांसह ज्येष्ठांना त्रास; विद्यार्थीही वैतागले

Pandharpur Accident: पंढरपुरातील पुलावरील भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू; आठजण गंभीर, वाहने २५ फूट खोली नदीत, नेमकं काय घडलं..

Pune Municipal Election : : आवाज वाढला; रविवार गाजला! पदयात्रा, फेरी, घरभेटींवर उमेदवारांचा भर

SCROLL FOR NEXT