Kashmera Shah Video esakal
मनोरंजन

Kashmera Shah Video: मसाज करायला गेली, गोत्यात आली!

व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओमध्ये कश्मिरा जोरजोरानं ओरडताना दिसत आहे. तिनं आपल्या सुटकेसाठी लोकांकडे मदत मागितली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Kashmera Shah instead of massage: बॉलीवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रेटी कश्मिरा शहा ही तिच्या हटकेपणाबद्दल नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. वादग्रस्त वक्तव्यं करणं, कुणाबद्ल आक्षेपार्ह टिप्पणी करणे यामुळे ती अनेकदा (viral video) नेटकऱ्यांच्या रडारवर आली आहे. सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असणाऱ्या कश्मिरानं आपल्या अनोख्या अंदाजानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता तिच्या व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनं वेगळ्याच चर्चेला सुरुवात (entertainment news) झाली आहे. मसाजसाठी गेलेल्या कश्मिराला आपल्या सुटकेसाठी मदतीची याचना करावी लागली आहे.

व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओमध्ये कश्मिरा जोरजोरानं ओरडताना दिसत आहे. तिनं आपल्या सुटकेसाठी लोकांकडे मदत मागितली आहे. बॉलीवूडमध्ये ग्लॅमरस लूक असणाऱ्या ज्या अभिनेत्री आहेत त्यात कश्मिराचेही नाव घ्यावे लागेल. या अभिनेत्रीनं केलेलं बोल्ड फोटोशुट हे नेटकऱ्यांना आवडले आहे. यापूर्वी देखील तिनं कित्येकदा केलेल्या फोटोशुटची सोशल मीडियावर चर्चा झाली आहे. त्याचं झालं असं की, कश्मिरा ही मसाज करायला गेली पण तिथे जे झालं त्यामुळे तिला विनाकारण आणखी दुसऱ्या एका समस्येला सामोरं जावं लागलं आहे. त्या परिस्थितीतून सुटका करण्यासाठी तिनं मदतीचे आवाहन केले.

मसाज सेंटरवर जे काही चालते त्याविषयीच्या अनेक बातम्या आपण सोशल मीडियावर वाचत असतो. पोलिसांकडून देखील अशा प्रकारच्या मसाज सेंटरवर छापा टाकल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. आता त्यात कश्मिराला आलेल्या वेगळ्या अनुभवानं सगळ्याचे लक्ष वेधले गेले आहे. कश्मिराचा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये ती एका मसाज सेंटरमध्ये मसाज करण्यासाठी आली होती. संबंधित त्या व्यक्तीनं कश्मिरा सोबत जे कृत्य केलं त्यामुळे कश्मिरा धक्का बसला. ती व्यक्ती कश्मिराच्या पायाला पकडून ओढताना दिसत आहे. यावेळी कश्मिरानं मोठमोठ्यानं ओरडून लोकांना मदतीसाठी बोलावल्याचे दिसून येत आहे.

कश्मिराचा हा व्हिडिओ भलताच गंमतीशीर आहे. ती त्या मसाज सेंटरमध्ये गेल्यावर त्या व्यक्तीनं तिचा जो मसाज केला तो तिला अजिबात अपेक्षित नव्हता. त्यापासून वाचण्यासाठी तिनं ओरडून मदतीचा धावा केला आहे. कश्मिराच्या त्या व्हायरल व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : पीडीपी नेत्या इल्तिजा मुफ्ती यांनी बिजबेहरा येथील जाबलीपुरा फळ बाजारात फळ उत्पादकांच्या आंदोलनात सहभाग घेतला

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT