The kashmir files Team esakal
मनोरंजन

गुजरातमध्ये 'काश्मीर फाईल्स' TAX FREE

काश्मिरी पंडीतांवर झालेल्या अत्यावर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

सुधीर काकडे

काश्मीर फाईल्स हा चित्रपट नुकताच रिलीझ झाला असून, चित्रपटाच्या विषयामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे. काश्मिरी पंडीतांवर झालेल्या अत्याचार आणि त्यासंबंधित घटनांवर आधारीत हा चित्रपट आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या या चित्रपटावरून एका ठराविक धर्माच्या लोकांवर लक्ष्य करण्यात आल्याची देखील टीका होतेय. तसंच कपिल शर्माच्या शोसाठी चित्रपट दिग्दर्शकांना पैसे मागितल्याची देखील चर्चा सुरु होती. त्यानंतर आता गुजरात सरकारने या चित्रपटासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

काश्मिरी पंडीतांवर झालेल्या अत्याचार आणि त्यानंतर त्यांना करावं लागलेलं पलायन हा विषय घेऊन, त्यांची व्यथा समजून सांगण्यासाठी हा चित्रपट निर्माण करत असल्याचं दिग्दर्शकांचं म्हणणं आहे. त्यातच आता गुजरात सरकारने महत्वाचा निर्णय घेतला असून, त्यानुसार काश्मीर फाइल्स हा चित्रपट आता राज्यात करमुक्त झाल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील द काश्मीर फाईल्स या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मोदींनी चित्रपटाची स्तुती करताना चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनाही धन्यवाद दिले आहे. अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी सोशल मीडियावर मोदींच्या भेटीचे फोटो शेयर केले आहेत. यावेळी निर्माता अभिषेक अग्रवाल देखील उपस्थित होते. त्यांनी लिहिलं आहे की, मोदींनी आमच्या चित्रपटाचे कौतूक केले याबद्दल त्यांचे धन्यवाद. आम्ही जे काही तयार केले त्याची त्यांनी दखल घेतली यासाठी त्यांचे विशेष आभार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी करणार, प्रवाशांच्या वेळ वाचणार, कधी पूर्ण होणार?

Horoscope : उद्या बनतोय प्राप्तीयोग! 'या' 5 राशीच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा; एका रात्रीत घडेल मोठी घटना, नोकरी-धंद्यात टर्न

Latest Marathi News Live Update : भूम तालुक्यात शेतकऱ्यांचं संतापजनक आंदोलन; महामार्गावर रास्ता रोको!

IPL 2026: RCB फॅन्सचा आनंद गगनात मावेना! CSK ला हरवल्यानंतर Video सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Kash Patel : इराणच्या हॅकर ग्रुपने हॅक केलं FBI डायरेक्टर काश पटेल यांचं अकाऊंट; डोनाल्ड ट्रम्पही चक्रावले, नेमकं प्रकरण जाणून घ्या

SCROLL FOR NEXT