Vicky Kaushal, Katrina kaif Google
मनोरंजन

विकी-कतरिना लग्नमंडपात पोहोचणार थेट हेलिकॉप्टरमधून

मीडियापासून पळ काढण्यासाठी सारा खटाटोप.....

प्रणाली मोरे

विकी-कतरीनानं जरी अजूनपर्यंत आपल्या रिलेशनशीपविषयी चुप्पी साधली असली तरी मीडियानं मात्र त्यांच्या लग्नाच्या इत्तंभूत माहितीची नोंद करून ठेवलीय. अगदी त्या दोघांच्या लग्नाच्या ड्रेसेसपासून ते मेहेंदी,लग्नाचा वेन्यू,मेन्यू,पाहुण्यांची लिस्ट,लग्नाला उपस्थित राहण्यासाठी जाहीर केलेल्या अटी अशा सगळयाच बारीक सारीक गोष्टी मीडीयानं समोर आणल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कतरिनाच्या आईला मुंबईत मोठ्या शॉपमध्ये शॉपिंग करताना पाहिले गेले होते. तर कतरिनाच्या घराबोहर तिची खास मैत्रिण आणि सेलिब्रिटी स्टायलिस्ट अनायता श्रॉफ- अदाजानियालाही मीटिंगसाठी आलेले पाहिले गेले होते. लग्नाशी संबंधित ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या घडत असल्यामुळे आता विकी-कतरिना जरी काही बोलत नसले तरी लग्न तर होणार यावर हळूहळू शिक्कामोर्तब होऊ लागलंय.

आता विकी-कतरीनाच्या लग्नाबाबतीत एक नवीन माहिती समोर येतेय ती म्हणजे विकी-कतरिना जयपूरला मुंबईतनं थेट प्रायव्हेट चॉपरमधनं जाणार आहेत. आणि जयपूरहूनही पुढचा लग्नाच्या वेन्यूपर्यंतचा दोन तासांचा प्रवास ते हेलिकॉप्टरमधूनच करणार आहेत. मीडिया दोघांच्या मागे हात धुवून लागलीय. त्यांच्या लग्नाचा एक तरी फोटो मिळावा यासाठी मीडिया तुटून पडणार. कोरोनाच्या काळात लोकांचीही गर्दी झाली तर मोठा गोंधळ होईल हे देखील एक मोठं कारण असावं विकी-कतरिनानं चुप्पी साधल्याचं आणि हेलिकॉप्टरने लग्नासाठी जाण्याचं. लग्नासाठी आणखी काही कडक नियम समोर आलेत. तर तो नियम आहे,पाहुण्यांना जयपूर ते सवाई माधोपूर या लग्नाच्या वेन्यूपर्यंत ज्या गाड्यांनी सोडण्यात येणार आहे त्या गाड्यांच्या ड्रायव्हर्सना त्यादिवशी स्मार्टफोन वापरण्याची परवानगी नाही. त्याऐवजी त्यांना साधे फोन देण्यात येणार आहेत.

विकी हा सध्याचा इंडस्ट्रीतला सर्वात बिझी अभिनेता आहे. नुकताच त्याचा 'सरदार उधमसिंग' हा सिनेमा प्रदर्शित झाला. तर 'तख्त','सॅम बहादूर','गोविंदा नाम मेरा','द इमोर्टल अश्वत्थामा' असे बिग बजेट चार सिनेमे रांगेत आपल्या भेटीस येणार आहेत. तर कतरिना कैफचा सलमानसोबतचा 'टायगर ३',फरहान अख्तरचा 'जी ले जरा','फोनभूत','ज्वेल ऑफ इंडिया','मेरी ख्रिसमस' असे अनेक सिनेमे आपल्या भेटीस येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT