Katrina Kaif sakal
मनोरंजन

Katrina Kaif: ...म्हणून कतरिनाने स्वतःला मीडियापासून केले दूर, जाणून घ्या नेमकं कारण

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ बऱ्याच दिवसांपासून पडद्यावर दिसलेली नाही.

Aishwarya Musale

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ बऱ्याच दिवसांपासून पडद्यावर दिसलेली नाही. ही अभिनेत्री शेवटची 'फोन भूत' चित्रपटात दिसली होती. यासोबतच कतरिनाने लग्नानंतर सार्वजनिक ठिकाणी येणे कमी केले आहे, त्यामुळे तिचे चाहते सोशल मीडियावर अनेक प्रश्न विचारत आहेत.

अभिनेत्री अलीकडेच ईदच्या मुहूर्तावर आयुष शर्मा आणि अर्पिता खानच्या घरी दिसली होती, त्यानंतर तिच्या प्रेग्नेंसीच्या अफवा पसरू लागल्या. यासोबतच असे म्हटले जात होते की, प्रेग्नेंसीमुळे अभिनेत्रीने सार्वजनिक ठिकाणी येणं कमी केलं आहे.

खरं तर, कतरिनाने प्रेग्नेंसी किंवा वैयक्तिक आयुष्यामुळे नव्हे तर तिच्या प्रोफेशनल लाइफमुळे सार्वजनिक ठिकाणी जाणे कमी केले आहे. होय, एका मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री तिचा आगामी चित्रपट 'टायगर 3' मध्ये खूप व्यस्त आहे. या चित्रपटात अभिनेत्री पुन्हा एकदा सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

चित्रपटामुळे, कतरिनाने सार्वजनिक ठिकाणावर जाणे बंद केलं आहे. जेणेकरून प्रेक्षकांना थिएटरमध्ये तिच्या भूमिकेबद्दल उत्सुकता राहील. अभिनेत्री 'टायगर 3' साठी खूप मेहनत घेत आहे जेणेकरून ती तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करू शकेल. कतरिना शेवटची 'फोन भूत' चित्रपटात दिसली होती. मात्र, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट प्रेक्षकांना प्रभावित करण्यात अपयशी ठरला.

'पठाण' नंतर शाहरुख खान आणि सलमान खान पुन्हा एकदा 'टायगर 3' मध्ये दिसणार आहेत. किंग खान 8 मे रोजी 'टायगर-3'च्या टीममध्ये या चित्रपटाच्या शूटिंगसाठी सामील होऊ शकतो. शाहरुख आणि सलमानचे चाहते त्यांच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT