Katrina Kaif Latest News Katrina Kaif Latest News
मनोरंजन

Katrina Kaif : लवकरच काही खास येणार आहे; कैफने केली पोस्ट, युजर्सने विचारले प्रश्न

लाल रंगाच्या ड्रेसमध्ये कतरिना खूपच सुंदर दिसत आहे

सकाळ डिजिटल टीम

Katrina Kaif Latest News कतरिना कैफने (Katrina Kaif) ताज्या पोस्टमध्ये (Post Viral) अतिशय आकर्षक लूक शेअर केला आहे. ‘लवकरच काहीतरी खास येणार आहे’ असे कॅप्शन तिने व्हिडिओसोबत लिहिले आहे. यासोबत तिने लिपस्टिकचा इमोजी शेअर केला आहे. तिने पोस्टमध्ये कशाबद्दल बोलत आहे हे सांगितले नाही. परंतु, असे दिसते की, तिला चाहत्यांना चांगली बातमी सांगायची आहे.

कतरिना कैफने २००३ मध्ये बूम चित्रपटातून पदार्पण केले होते. जवळपास दोन दशकांच्या कारकिर्दीत तिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. कतरिनाने इंडस्ट्रीत एक स्थान निर्माण केले आहे. तिचे खूप चाहते आहेत. ती दररोज चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करीत असते. लेटेस्ट व्हिडिओमध्ये कतरिना खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे.

लाल रंगाच्या ड्रेसमध्ये कतरिना खूपच सुंदर दिसत आहे. कतरिनाने (Katrina Kaif) केस मोकळे सोडले आहे. अलीकडे कतरिना आणि तिचा नवरा अभिनेता विक्की कौशल ट्रेंड लिस्टमध्ये टॉपवर आहे. दोघेही एका प्रोजेक्टवर एकत्र काम करीत आहेत. हा चित्रपट नसून जाहिरात आहे. कतरिना स्वतःचा कॉस्मेटिक्स ब्रँड देखील चालवते. याकडे लक्ष वेधत काही चाहत्यांनी प्रश्न विचारले आहेत.

कतरिना कैफकडे बरेच प्रोजेक्ट आहेत. ती लवकरच सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टरसोबत फोन भूत चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट ४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तिच्याकडे मेरी ख्रिसमस देखील आहे. याशिवाय कतरिनाकडे मनीष शर्माचा टायगर ३ देखील आहे. सोबतच प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्टसोबत फरहान अख्तरच्या जी ले जरा या चित्रपटात काम करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Honor Killing Case : 40 वर्षाच्या तरुणाचं 19 वर्षाच्या तरुणीवर प्रेम; मुलीच्या घरात कळताच बापानं गाडीतच गळा चिरून केली प्रियकराची हत्या

Mumbai News: मद्य परवानगीवर न्यायालयाचे प्रश्नचिन्ह, धोरणाबाबत पुनर्विचार करण्याचे आदेश

Latest Marathi News Live Update : राष्ट्रीय तपास संस्थेने महाराष्ट्रातील दिनेश पुसू गावडे हत्या प्रकरणात आणखी दोन फरार आरोपींना अटक केली

१८७ पदांसाठी ८ हजार उमेदवार, थेट विमानतळाच्या धावपट्टीवर घेतली परीक्षा; पाहा Drone VIDEO

Pirangut Accident : पिरंगुट घाटात भीषण अपघात; तिघेजण जखमी, सुदैवाने जीवितहानी नाही

SCROLL FOR NEXT