Katrina Kaif Video Esakal
मनोरंजन

Katrina Kaif Video: कतरिना अन् विकीच्या घरी नवा पाहुणा येणार? व्हिडिओ व्हायरल..

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूड अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्मा आणि तिचा पती आयुष शर्मा यांनी काल भव्य अशी ईद ची पार्टी दिली. ज्याची चर्चा सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

त्यांच्या ईद पार्टीत हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक मोठे आणि प्रसिद्ध चेहरे आले होते. सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानी, एमएस धोनीची पत्नी साक्षी धोनी, नेहा शर्मा, तब्बू, एमसी स्टॅनसह अनेक स्टार्स पोहोचले.

अर्पिताच्या ईद पार्टीत कतरिना कैफने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. सगळ्यांना तिचा साधा सुंदर लुक इतका आवडला की कतरिना पार्टीत खपुच चर्चा झाली. कतरिनाने सैल पांढरा सूट परिधान केला होता. या लूकमध्ये ती खूपच क्यूट दिसत होती. यावेळी तिने पापाराझींनी पोझही दिली.

यादरम्यान ती सारखी तिची ओढणी आवरतांना दिसली आणि तिचा हात बहुतेक वेळा तिच्या पोटावर होता. अशा स्थितीत ती प्रेग्नंट असल्याची आणि बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा अंदाज लोक बांधू लागले.

कतरिना कैफने 2021 मध्ये अभिनेता विकी कौशलसोबत लग्न केले. लग्नानंतर कतरिना प्रेग्नंट असल्याची अफवा अनेकदा समोर आली आहे.

शनिवारी संध्याकाळी जेव्हा ती सलमान खानची बहीण अर्पिता खान आणि तिचा पती आयुष शर्मा यांच्या ईद पार्टीत दिसली तेव्हा पुन्हा एकदा तिच्या गरोदरपणाच्या अफवा उडू लागल्या.

तिचा व्हिडीओ पाहून काही लोक म्हणत आहेत की, ती तिचा बेबी बंप दुपट्टा आणि हाताने लपवण्याचा प्रयत्न करत आहे

एकीकडे सोशल मीडिया यूजर्स कतरिनाच्या प्रेग्नेंसीबद्दल बोलत आहे तर दुसरीकडे याबाबत काही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

आता खरं काय आहे हे फक्त कतरिना आणि विकीलाच माहीत आहे. तरी चाहते मात्र ही गूडन्युज ऐकण्यासाठी खुपच उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT