Katrina Kaif Katrina Kaif Net Worth:  Esakal
मनोरंजन

Katrina Kaif Birthday: बी ग्रेड चित्रपटातून करियरची सुरुवात अन् आता करोडोंची मालकीण! नेटवर्थ पाहून फिरतील डोळे

Vaishali Patil

Katrina Kaif Net Worth:  कतरिना कैफ हे बॉलिवूडमधलं आघाडीचं नाव आहे. कतरिनाने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिच्या मेहनत आणि अभिनयाच्या बळावर कतरिनाने इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.

आज तिला अनेक हिट सिनेमांसाठी ओळखलं जाते. कतरिना कैफ बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.

ती आज 16 जुलै रोजी तिचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिने विकी कौशलसोबत लग्न केल्यानंतर ती अधिक चर्चेत आली.

कतरिनाने 2003 मध्ये 'बूम' या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली. बी-टाऊनचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आणि गुलशन ग्रोव्हर यांच्यासोबत तिने स्क्रिन शएयर केली होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.

मात्र कतरिना ही तिच्या अनेक हिट चित्रपटांसाठीही ओळखली जाते. ज्यात 'नमस्ते लंडन', 'एक था टायगर' आणि 'धूम 3' आणि 'जब तक है जान' असे सर्वोत्कृष्ट चित्रपट आहेत. आज कतरिना बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. अनेक हिट सिनेमा देणारी कतरिना ही करोडोंची मालकिन आहे. कतरिनाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या संपत्तीवर एक नजर टाकूया.

कतरिना कैफही एका चित्रपटासाठी तब्बल 10 ते 12 कोटी रुपये घेते. इतकच नाही तर कतरिना जाहिरातीतूनही खुप पैसा कमावते. त्याचबरोबर ती जाहिराती आणि सोशल मीडियातून 6-7 कोटी रुपये कमावते

कतरिनाचे लंडन, मुंबई, न्यूयॉर्क यांसारख्या शहरात आलिशान घरं देखील आहेत. मुंबईत तिने तिच्या आवडीची प्रत्येक छोटी-मोठी वस्तू घरात ठेवली आहे. या फ्लॅटची किंमत सुमारे 8 कोटी आहे.

कतरिनाकडे आलिशान गाड्यांही आहेत. तिच्याकडे 42 लाखांची Audi Q3, 50 लाखांची Mercedes ML 350, Audi Q7 आहे ज्यांची किंमत 80 लाख आहे.

2019 मध्ये कतरिनाने तिचा स्वतःचा मेकअप ब्रँड Kay Beauty लाँच केला. तिच्या सौंदर्य आणि मेकअपच्या आवडीमुळे या ब्रँड ला यश देखील मिळाल.ज्याला अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. या ब्रँड मधूनही ती बरेच पैसे कमावते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिनाची एकूण संपत्ती 230 कोटींच्या आसपास आहे. तर तिचा पती विकी कौशलची एकूण संपत्ती 160 कोटींच्या जवळपास आहे. कतरिनाने 2021 मध्ये विकी कौशलशी लग्न केले. दोघेही एकत्र पोज देताना फोटो शेअर करत असतात.

कतरिना कैफ सध्या 'टायगर 3' ची शुटिंग करत आहे. या चित्रपटात कतरिना लग्नानंतर पहिल्यांदाच सलमान खानसोबत दिसणार आहे. लग्नानंतर तिचा 2022 मध्ये 'फोन भूत' चित्रपट प्रदर्शित झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT