katrina kaif birthday : The movie flopped.. but Katrina became hit  sakal
मनोरंजन

चित्रपट फ्लॉप झाला.. पण कतरिना हीट झाली.. 'हा' आहे कतरिनाचा इतिहास..

आज सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये कतरिनाचे नाव आहे..

नीलेश अडसूळ

katrina kaif birthday : कतरिना कैफचं(Katrina Kaif) नाव बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं. तिनं तिच्या करिअरमध्येही अनेक ब्लॉकबस्टर सिनेमातून काम केलं आहे. आणि आता विकी कौशलसोबत लग्न करुन ती मस्त आनंदात आपलं वैवाहिक आयुष्य जगत आहे. गेले काही दिवस ती प्रेग्नंट असल्याची चर्चा आहे. त्यामुळे चाहत्यांचे सगळे लक्ष कतरिनाकडे लागले आहेत. अशातच आज 16 जुलै, म्हणजे कातरिनाचा वाढदिवस. कतरिना आज वयाच्या 40 व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया, कशी झाली होती तिच्या करियरची सुरुवात..

(katrina kaif birthday : The movie flopped.. but Katrina became hit)

बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी कतरिना कैफ मॉडेलिंग करायची. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी तिने मॉडेलिंगला सुरुवात केली होती. मॉडेलिंगच्या काळात तिला 2003 मध्ये आलेल्या 'बूम' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ, गुलशन ग्रोवर, मधु सप्रे आणि पद्मा लक्ष्मी हे कलाकार होते. या चित्रपटाची निर्मिती जॅकी श्रॉफची पत्नी आयेशा श्रॉफने केली होती. पण, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. या चित्र[पटाने कमाई तर केली नाहीच शिवाय निर्मात्याचे इतके नुकसान झाले की त्याला युनिटचे पैसे देण्यासाठी घर विकावे लागले.

(katrina kaif upcoming movie) (katrina kaif age) (katrina kaif and vicky kaushal)

यामध्ये एक झाले, की चित्रपट फ्लॉप झाला पण कतरिना चमकली. या चित्रपटातील कतरिना कैफच्या बोल्ड लूकमुळे तिची बरीच चर्चा झाली. 'बूम' आपटल्यानंतर कतरिनाने साऊथकडे गेली. तिचे तिने 'मल्लीस्वरी' या तेलगू चित्रपटात काम केले. यानंतर ती पुन्हा बॉलिवूडमध्ये आली आणि तिला 'सरकार' हा चित्रपट मिळाला. या चित्रपटात तिच्या भूमिकेला फारसा वाव मिळाला नाही. पण त्यानंतर आलेल्या सलमान खानच्या 'मैंने प्यार क्यूं किया' या चित्रपटाने कतरिनाला खरी ओळख मिळवून दिली. यानंतर कतरिनाने 'नमस्ते लंडन', 'सिंग इज किंग', 'पार्टनर', 'अजब प्रेम की गज़ब कहानी', 'एक था टायगर', 'जब तक है जान', 'टायगर जिंदा' असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. आता कतरिना कैफची ही बॉलीवुड मधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railway : नवरात्रोत्सवापासून ते दिवाळीपर्यंत... 'या' राज्यात धावणार विशेष गाड्या; 6,000 गाड्यांचं नियोजन, पाहा रेल्वेचं वेळापत्रक

Women Health: पाळी, गरोदरपणा आणि रजोनिवृत्तीचा स्त्रियांच्या आतड्यांवर परिणाम; वाचा डॉ. राकेश पटेल यांचे सविस्तर मार्गदर्शन

Gemini AI Photo Trend: जगातील नेत्यांसोबत हायपर-रिअ‍ॅलिस्टिक फोटो तयार करा! जाणून घ्या सोप्या स्टेप्स...

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजना बंद होणार नाही: मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही

SIP Top 5 Mistakes: SIP मध्ये गुंतवणूक करताय? या 5 चुका टाळा, नाहीतर रिटर्न्स मिळण्याऐवजी नुकसान होऊ शकतं

SCROLL FOR NEXT