Katrina Kaif fluants baby bump in viral picture? christmas party photo Google
मनोरंजन

Katrina Kaif: 'लपू नकोस..आम्हाला कळलं..', कतरिनाच्या ख्रिसमस सेलिब्रेशन फोटोवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

कतरिना कैफनं आपलं कुटुंब आणि मित्र-परिवारासोबत केलेल्या ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले अन् तिच्या बेबी बंपची चर्चा रंगली.

प्रणाली मोरे

Katrina Kaif: बॉलीवूडमधील रोमॅंटिक जोडपं कतरिना कैफ आणि विकी कौशलने त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह ख्रिसमस साजरा केला. इंडस्ट्रीतील त्याचे जवळचे मित्रही या पार्टीत सामील झाले होते. या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे ते एका कारणानं... हे फोटो पाहून कतरिना कैफ प्रेग्नंट आहे का? हा प्रश्न पुन्हा उठला आहे. कारण प्रत्येक फोटोमध्ये कतरिना ही फोटो काढताना कोणा नं कोणाच्या मागे लपताना दिसली. आणि म्हणूनच कतरिनाचे फोटो पाहून लोकांनी अंदाज लावला की अभिनेत्री प्रेग्नंट आहे.(Katrina Kaif fluants baby bump in viral picture? christmas party photo)

कतरिना आणि विकीने लग्नानंतरचा त्यांचा दुसरा ख्रिसमस फॅमिली आणि मैत्रपरिवारा सोबत आनंदाने साजरा केला. कतरिनाने एक फोटो शेअर केला आहे, ज्यात ती विकी कौशल,तिची बहीण ,फॅमिलीत अशा सगळ्यांच्या मागे उभी आहे. इतकेच नव्हेतर तर नेहा धुपीया आणि अंगद बेदी सोबतच्या फोटोतही ती मागे उभी होती. त्यामुळे आता एकच चर्चा आहे कतरिना कैफ बेबी बंप लपवत आहे की काय?

प्रत्येक फोटोमध्ये एक गोष्ट लोकांच्या लक्षात आली की प्रत्येक फोटोमध्ये कतरिना कोणाच्या ना कोणाच्या मागे उभी होती. एका यूजरने स्पष्टपणे लिहिले की, ''कतरिना जाणूनबुजून अशा अँगलने उभी होती की तिचं बेबी बंप दिसू नयेट. ही तर प्रेग्नंट दिसत असल्याचे लोकांनी स्पष्टपणे लिहिले आहे. यासोबतच कतरिनाने ख्रिसमस ट्रीवर एक फोटोही टाकला होता ज्यात विकी तिला मागून मिठी मारत आहे. या फोटोमध्येही लोकांना कतरिनाचं बेबी बंप दिसलं.

इतकेच नव्हे तर मध्यंतरी कतरिना कैफ एका अवॉर्ड शोमधे गेली होती . कतरिनानं या कार्यक्रमात चमकदार बॅकलेस गाऊन घातला होता, ज्यामध्ये ती इतकी जबरदस्त दिसत होती की चाहते तिची कौतुक करत होते. कतरिनाचा आकर्षक लूक पाहून चाहत्यांचे लक्ष तिच्या पोटाकडे गेले. त्या व्हिडिओमध्ये कतरिनाचे बेबी बंप दिसत होतं.

कतरिना कैफ नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'फोन भूत' चित्रपटात दिसली होती.तर विकी कौशल OTT वर रिलीज झालेल्या 'गोविंदा नाम मेरा' मध्ये दिसला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: मुंबईत मुसळधार पावसाचा आढावा, उपमुख्यमंत्री शिंदे यांची आपत्कालीन कक्षास भेट

Mumbai-Pune Latest Rain Live Updates Maharashtra : एकनाथ शिंदे यांनी आज महापालिकेच्या आपत्कालीन कक्षास दिली भेट

Tejashwi Yadav : ''महाआघाडी 2029मध्ये राहुल गांधींना पंतप्रधान बनवणार'' ; तेजस्वी यादव यांनी केली घोषणा, मात्र...

Mumbai Rain Update: डोंबिवली रस्ते पाण्याखाली, खासदारांच्या घरातही पाणी शिरलं, पाहा परिस्थिती

Asia Cup 2025 India Squad: शुभमन गिलमुळे यशस्वी जैस्वालवर अन्याय? सूर्यकुमार यादवने सांगितलं का केलं त्याला उपकर्णधार

SCROLL FOR NEXT