Katrina Kaif gets angry with paparaazi Google
मनोरंजन

Katrina Kaif: तावातावानं गाडीतून बाहेर आली आणि थेट..., पापाराझींवर का भडकली कतरिना?

पापाराझींवर भडकल्याचा कतरिना कैफचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

प्रणाली मोरे

Katrina Kaif: बॉलीवूड अभिनेत्री कतरिना केफ नेहमीच कूल मूडमध्ये दिसते. सहसा मीडियासमोर किंवा पापाराझींच्या कॅमेऱ्याला पोझ देताना तर तिच्या चेहऱ्यावर मधाळ हास्य पहायला मिळतं. ती सर्वांशी प्रेमाने बोलतानाही दिसते. पण नुकताच तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात ती पापाराझींवर रागावताना दिसत आहे.

गाडीतून उतरत अक्षरशः पापाराझींवर गळा काढून ओरडताना दिसली आणि म्हणाली, ''तुमचा कॅमेरा बंद करा पहिला''. कतरिनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे, आणि यावर नेटकरी मात्र वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.(Katrina Kaif gets angry with paparaazi)

या व्हिडीओत पहिल्यांदा तर कतरिना गाडीमध्ये बसताना दिसत आहे,पण जसं पापाराझी तिला हाक मारतात,आणि फोटो काढण्यासाठी तिच्या दिशेने पुढे जातात,तसा कतरिनाला राग येतो. ती गाडीमध्ये बसता-बसताच काहीतरी पुटपुटते. आणि चिडत पुन्हा गाडीतनं बाहेर येत आणि पापाराझींना इशारा करत म्हणते,'' तुमचा कॅमेरा बंद करा पहिला''.

आता कतरिनाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक त्यावर कमेंट करताना दिसत आहेत. कुणी म्हणतंय तिनं खूप प्रेमानं कॅमेरा बंद करायला सांगितला तर कुणी म्हणतंय ही काय बोलायची पद्धत.

कतरिनाच्या कामाविषयी बोलायचं झालं तर कतरिना कैफ काही दिवसांपूर्वी 'फोन भूत' सिनेमात सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर सोबत दिसली होती. हा सिनेमा १० ऑक्टोबर रोजी रिलीज झाला. पण बॉक्सऑफिसर सिनेमानं फार काही कमाल दाखवली नाही.

आता कतरिना कैफ सलमान खानच्या 'टायगर ३' सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा २०२३ मध्ये रिलीज होणार आहे. याव्यतिरिक्त 'मेरी ख्रिसमस' सिनेमातही ती दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT