Katrina Kaif Praises Vicky Kaushal  esakal
मनोरंजन

Katrina Kaif : 'गरीब आहे माझा नवरा, मी बोलत राहते तो बिचारा ऐकत राहतो' ! कतरिनानं केलं विकीचं कौतुक

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ ही नेहमीच तिच्या सौंदर्यामुळे आणि हटके स्टाईलमुळे चर्चेत राहिली आहे.

युगंधर ताजणे

Katrina Kaif Praises Vicky Kaushal : बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ ही नेहमीच तिच्या सौंदर्यामुळे आणि हटके स्टाईलमुळे चर्चेत राहिली आहे. सध्या तिचा आणि साऊथचा सुपरस्टार विजय सेतुपतिचा मेरी ख्रिसमस नावाचा चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहे. ती सध्या त्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले आहे.

कतरिना अन् विजय सेतुपति पहिल्यांदाच मेरी ख्रिसमसच्या निमित्तानं स्क्रिन शेयर करताना दिसणार आहे. त्याच्या व्हायरल झालेल्या ट्रेलरला प्रेक्षकांचा, नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. अंधाधून, बदलापूर या चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

मेरी ख्रिसमच्या निमित्तानं जे प्रमोशन सुरु आहे त्याच्या एका मुलाखतीमध्ये कतरिनाला विकी सोबतच्या वैवाहिक प्रवासाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी तिनं दिलेलं उत्तर हे चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. तिनं विकीचं कौतुक केलं आहे. माझा नवरा हा भलताच गरीब आहे. मी नॉनस्टॉप बोलत राहते, तो बिचारा ऐकत राहतो अशा शब्दांत कतरिनानं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पिंकव्हिलाला दिलेल्या त्या खास मुलाखतीची चर्चा होताना दिसत आहे. यावेळी तिनं तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही खास गोष्टीही चाहत्यांना शेयर केल्या आहेत. मी जेव्हा घरी जाते तेव्हा त्याच्याशी सतत पाऊण तास बोलत राहते तो मात्र शांतपणे माझं सगळं ऐकून घेतो. काहीही बोलत नाही. मला समजून घेतो. कधी कधी तर रागानंही मी त्याच्याशी बोलते पण त्याचा शांतपणा ढळत नाही. असे कतरिनानं म्हटले आहे.

विजय अन् कतरिनाच्या आगामी चित्रपटाविषयी बोलायचे झाल्यास तो पहिल्यांदा १५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. आता तो १२ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चाहते या चित्रपटाची वाट पाहत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Safety Tips : अचानक बिबट्या दिसला तर काय करायचं..? ; सुरक्षित राहण्यासाठी पाळा वनविभागाच्या 'या' सूचना

"सचिन पिळगावकर यांचं इंडस्ट्रीतील योगदान प्रचंड" ट्रोलिंगवर क्षितिज पटवर्धनने ओढले ताशेरे; "त्यांचे सिनेमे.."

Pakistan: असीम मुनीर यांच्या हातात पाकिस्तानचा कंट्रोल; अण्वस्त्र अन् तिन्ही सशस्त्र दलांचे मिळाले अधिकार

Latest Marathi News Live Update: वर्सोव्यात २२ हजारांहून अधिक बोगस मतदार

Zudio Sale : झुडिओ Black Friday Sale उद्यापासून सुरू; काय असतील डिस्काउंट ऑफर? कोणत्या वस्तू किती स्वस्त मिळणार..सगळं एका क्लिकवर पाहा

SCROLL FOR NEXT