Katrina kaif is taking care of her mother-in-law at sam bahadur movie special screening vicky kaushal SAKAL
मनोरंजन

Katrina Kaif: भर गर्दीत सासूबाईंना सांभाळताना दिसली कतरिना, व्हायरल व्हिडीओ पाहून होतंय कौतुक

विकी कौशलचा सॅम बहादुर सिनेमा पाहायला त्याचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतो

Devendra Jadhav

Katrina kaif Viral Video: विकी कौशलच्या सॅम बहादुर सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमाला रिलीजआधीपासुनच प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळत आहे. हा सिनेमा अवघ्या काहीच तासांमध्ये सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

अशातच या सिनेमाचं काल मुंबईत खास स्क्रीनींग झालं. त्यावेळी विकीचं संपूर्ण कुटुंब त्याचा सिनेमा पाहायला उपस्थित होतं. त्यावेळी स्क्रीनींगसाठी आपल्या कुंटुबिंयासोबत आलेल्या कतरिनाचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे .

कतरिनाच्या व्हायरल व्हिडीओवर होतोय कौतुकाचा वर्षाव

काल मुंबईतील जुहू येथे झालेल्या स्पेशल स्क्रीनींगवेळी विक्की कौशलचे संपूर्ण कुटुंब 'सॅम बहादुर' पाहायला आले होते. चित्रपट संपल्यानंतर कतरिना तिचे सासरे, सासू आणि विकीच्या भावासह थिएटरमधून बाहेर आली.

कौशल कुटुंबाला एकत्र पाहून पापाराझींना तो खास क्षण कॅमेऱ्यात कैद करायचा होता. विकीची आई थोडी गोंधळली होती. त्यावेळी कतरिना सासूची काळजी घेताना दिसली. तिने त्यांच्या हाताला धरुन त्यांना बाहेर आणले. आणि मिठी मारत त्यांना निरोप दिला. कतरिनाच्या काळजीवाहू स्वभावाचं कौतुक होतंय.

सॅम बहादुरच्या स्क्रीनींगआधी विकीने घेतले आई - बाबांचे आशिर्वाद

'सॅम बहादुर'च्या स्क्रिनिंगला विक्की कौशलचे आई-वडीलही उपस्थित होते. वडील शाम कौशल आणि आई वीणा कौशल येताच विकीने त्यांच्या पायाला स्पर्श करुन त्यांचा आशिर्वाद घेतला. भाऊ सनीला कौशलने मिठी मारली.

विकी कौशलच्या या नम्र स्वभावाने चाहत्यांची मने जिंकली. 'सॅम बहादूर'च्या स्क्रिनिंगला अभिषेक बच्चननेही हजेरी लावली होती.

सॅम बहादुरची उत्सुकता शिगेला

‘सॅम बहादुर’ चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले असून त्यांनी भवानी अय्यर आणि शंतनू श्रीवास्तव यांच्या समवेत या चित्रपटाचे लेखन देखील केले आहे. या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांनी ‘आरएसव्हीपी मूव्हीज’च्या बॅनरखाली करण्यात आली आहे.

या चित्रपटात विकी कौशल व्यतिरिक्त फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, नीरज काबी, एडवर्ड सोनेनब्लिक आणि झीशान अय्युब यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘सॅम बहादूर’ हा चित्रपट १ डिसेंबर २०२३ रोजी चित्रपटगृहांत झळकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smart Meter Camera: 'महावितरण'च्या स्मार्ट मीटरमध्ये खरंच कॅमेरा आहे का? वीज वितरण कंपनीकडून स्पष्टीकरण

Latur Police Raid: वाढवणा पोलिसांची तिर्रट जुगार अड्ड्यावर धाड; २३.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त, ८ जणांविरुद्ध गुन्हा

Inter-State Robbery Gang: ओतूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दरोड्याच्या तयारीतील आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Pune News : सासरच्या मंडळींकडून जावयांना मारहाण; एकाचे नाकाचे हाड मोडले, तर दुसऱ्याला बॅटने झोडपले!

Dnyaneshwar Wakade case: बीडमध्ये भररस्त्यात थरार! ज्ञानेश्वरवर दगड, विटा ,चाकूने वार! नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT