katrina kaif on towel scene in tiger 3 with actress mitchell salman khan SAKAL
मनोरंजन

Tiger 3: चर्चेत असलेला टॉवेल सीन कसा शुट झाला? अभिनेत्री अनुभव शेअर करताना म्हणाली...

टायगर 3 सिनेमात असलेल्या प्रसिद्ध टॉवेल सीनच्या शुटींगचा भन्नाट अनुभव अभिनेत्रीने सांगितला

Devendra Jadhav

Tiger 3 Katrina Kaif: सध्या टायगर 3 सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. सलमान खान - कतरिना कैफची प्रमुख भुमिका असलेला टायगर 3 सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे.

सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपुर्वी रिलीज झाला. सर्वांना हा ट्रेलर आवडला. या ट्रेलरमध्ये एक खास गोष्ट चर्चेत राहिली ती म्हणजे कतरिना कैफचा टॉवेल सीन. हा टॉवेल सीन शुट करताना काय अनुभव आला याचा अनुभव कतरिनाने शेअर केलाय.

(katrina kaif on towel scene in tiger 3 with actress mitchell lee salman khan)

हॉलिवूड अभिनेत्री मिशेल ली सोबत कतरिनाने हा अत्यंत कठिण असा फाईट सिक्वेन्स शूट केला आहे. मिशेल आता सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर अॅक्शन स्पेक्‍कल टायगर 3 साठी निवडण्यात आले आहे. टायगर 3 मधील तुर्की हमाम मधील मिशेल आणि कतरिनाने टॉवेल फाईट सीन सध्या चांगलाच चर्चेत आहे!

मिशेलने खुलासा केला हा सीक्‍वेन्‍स शूट करण्‍यापूर्वी तिने 2 आठवड्यांहून अधिक काळ सराव केला होता!

मिशेल म्हणते, “मी आणि कतरिनाने दोन आठवडे या सीनसाठी तयारी केली. आणि नंतर आम्ही त्याचे चित्रीकरण केले. सेटची रचना पूर्णपणे भव्य होती आणि फाइट करणे खरोखर मजेदार होते. ”

मिशेल कतरिना कैफची स्तुती करताना म्हणाली, “कतरिना या सीनच्या वेळी खुप ग्रेसफुल आणि प्रोफेशनल होती. कतरिनाने ही फाईट परफेक्ट करण्यासाठी कठोर परिश्रम केले. आम्ही हा सीन करताना खुप घाम गाळला आहे !”

याशिवाय मिशेल म्हणते की, शरीराभोवती गुंडाळलेले टॉवेल सांभाळणे हे या हमाम सीनचे सर्वात मोठे आव्हान होते.

मिशेल पुढे म्हणाली, “हा सीन करताना टॉवेल योग्य ठिकाणी राहणे आवश्यक होतेय. हा सीन करताना खूप हालचाल आणि कोरियोग्राफी होती. त्यामुळे हे निश्चितच आव्हान होते. आम्ही काही विशिष्ट ठिकाणी टॉवेल शिवले आहेत, त्यामुळे आम्हाला खूप मदत झाली.”

YRF स्पाय युनिव्हर्स मधील टायगर 3 ची निर्मिती आदित्य चोप्रा यांनी केली आहे आणि मनीष शर्मा यांनी दिग्दर्शन केले आहे. या दिवाळीत, 12 नोव्हेंबर, रविवारी हिंदी, तमिळ आणि तेलुगू मध्ये रिलीज होणार आहे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT