Katrina Kaif Google
मनोरंजन

'मेरी ख्रिसमस'च्या सेटवरनं लीक झाले फोटो, कतरिनाला पाहून चाहते क्लीन बोल्ड

कतरिना कैफनं विकी कौशलसोबत लग्न केल्यानंतर आता चाहत्यांना मिसेस.विकी कौशल बनल्यानंतर ती पडद्यावर कशी दिसते हे पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे

प्रणाली मोरे

कतरिना कैफनं(katrina Kaif) विकी कौशल(Vicky Kaushal) सोबत लग्न केल्यानंतर आता चाहत्यांना मिसेस.विकी कौशल बनल्यानंतर ती पडद्यावर कशी दिसते हे पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. कतरिना कैफ काही दिवसांपूर्वीच विकी कौशलसोबत व्हॅकेशनला गेली होती. अन् मुंबईत परतल्यावर लगोलग तिनं कामाला सुरुवात केली. सध्या ती आपल्या 'मेरी ख्रिसमस'(Merry Christmas) या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. खरंतर,कतरिनानं विक्कीशी लग्न केल्यानंतर श्रीराम राघवन दिग्दर्शन करीत असलेल्या 'मेरी ख्रिसमस' या सिनेमाची घोषणा केली होती. आता थेट सिनेमाच्या शूटिंग सेटवरुनच सोशल मीडियावर कतरिनाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

कतरिना कैफचे सध्या काही झकास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बोललं जात आहे की,हे फोटो कतरिनाच्या आगामी 'मेरी ख्रिसमस' सिनेमाच्या सेटवरचे आहेत. या फोटोत कतरिना कैफसोबत अभिनेत्री राधिका सरथकुमारही दिसत आहे,जी या फोटोत एका महिला पोलिस कर्मचारीच्या पेहरावात दिसत आहे. कतरिना कैफने लीक झालेल्या या फोटोत लाल रंगाचा एक ड्रेस घातलेला आहे,ज्यावर पोल्का डॉट्सची डीझाईन आहे. पहिल्या फोटोत जिथे कतरिना आणि राधिका चेहऱ्यावर चिंतेचे भाव ठेवून काहीतरी पाहत आहेत,तिथे दुसऱ्या फोटोत कतरिना कैफ समोरच्या दिशेने पाहत आहे. इतर काही फोटोत कतरिनाच्या हातात स्क्रिप्ट आहे आणि ती शांत उभी राहिलेली दिसत आहे.

श्रीराम राघवनच्या 'मेरी ख्रिसमस' सिनेमात कतरिना पहिल्यांदा साऊथ स्टार विजय सेतुपतिसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ज्याची माहिती कतरिनानं सोशल मीडियावर याआधीच आपल्या चाहत्यांना दिली होती. कतरिनानं विजय आणि दिग्दर्शक श्रीराम राघवनसोबत फोटो शेअर करत लिहिलं होतं,''नवीन सुरुवात,मेरी ख्रिसमसच्या शूटिंगसाठी दिग्दर्शक श्रीराम राघवनसोबत पुन्हा कामाला सुरुवात,मला श्रीराम राघवनसोबत काम करण्याची खूप इच्छा होती. आणि विजय सेतुपतिसोबत काम करण्यास मी खूप उत्सुक आहे''.

कतरिना मेरी ख्रिसमससोबतच टायगर ३ मध्ये सलमा खानसोबत पुन्हा दिसणार आहे. टायगर ३ पुढील वर्षी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याबरोबरच कतरिना इशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत फोन भूत मध्ये काम करत आहे. तसंच,फरहान अख्तरच्या जी ले जरा या सिनेमात ती प्रियंका चोप्रा आणि आलिया भट्ट सोबतही स्क्रीन शेअर करताना दिसमार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महात्मा गांधींच्या पुतळ्याला भाजपची टोपी, हातात पक्षाचा झेंडा; NDAच्या शिबिरात नेत्यांचा प्रताप, काँग्रेसचा हल्लाबोल

Maharashtra Politics : ३२ टक्के राजकारणी घराणेशाहीचे प्रतिक; ‘एडीआर’च्या अहवालातील महाराष्ट्राची स्थिती

Pune News : पुण्यातील शेतकऱ्याच्या अनोख्या आंदोलनाची चर्चा; तीन वेळा आमरण उपोषण करूनही दखल नाही, आता थेट कारवरच...

IND vs PAK Asia Cup 2025: पहलगाम हल्ल्यानंतर युद्ध केलंत, तेही नीट केले नाही, मागे हटायला...; पाकिस्तानी खेळाडूचं वादग्रस्त विधान

Wholesale Inflation India : घाऊक महागाईचा दर वाढला! 4 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आकडेवारी, सामान्य जनतेला फटका

SCROLL FOR NEXT