Katrina Kaif,Vicky kaushal,isabelle Kaif Esakal
मनोरंजन

कतरीनाच्या बहिणीने विकीचे केले स्वागत, म्हणाली मला भाऊ मिळाला...

इजाबेलने विकी आणि कतरिनाचा फोटो पोस्ट करत स्वागत केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

कतरीना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशलच्या (Vicky Kaushal) लग्नाची सध्या सोशल मिडियावर चर्चा आहे. हा शाही लग्नसोहळा संपवून हे कुटुंब आता मुंबईला (Mumbai) परतले आहे. हे दोघेही नव्या वैवाहीक आयुष्याला सुरूवात करत आहे. विविध माध्यमातून या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर ट्विटरवर विकी-कतरीनाच्या नावाचे हॅश्टॅग ट्रेंडिंग आहेत. विकी कौशलचा भाऊ सनी कौशलनेही (Sunny Kaushal) कतरिनाचे स्वागत सोशल मिडियावर पोस्ट करत केले आहे. तर आता कतरिनाची बहीण इजाबेलने (Isabelle Kaif) देखील सोशल मिडियावर पोस्ट करत विकी कौशलचे कुटुंबात स्वागत केले आहे.(Isabelle Kaif viral Post)

कतरिना कैफची बहीण इजाबेल कैफने विकी आणि कतरिनाचा फोटो शेअर केला आहे. शिवाय तीने पोस्ट करत स्वागत केले आहे. ती पोस्टमध्ये म्हणते, 'काल मला भाऊ मिळाला. आमच्या वेड्या कुटुंबात स्वागत आहे. तुम्ही आम्हाला भेटलात, आम्ही खूप भाग्यवान आहोत. तुम्हाला जगातील सर्व प्रेम आणि आनंद सदैव मिळो. अनंतकाळासाठी शुभेच्छा. अशा प्रकारे इतर सर्वांप्रमाणे दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी कतरिना-विकीला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

इजाबेल कैफच्या या पोस्टवर चाहत्यांकडूनही अभिनंदनाच्या प्रतिक्रिया येत आहेत. एका चाहत्याने लिहिले, 'अभिनंदन कतरिना कैफ, नेहमी आनंदी राहा.' विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाचे फंक्शन ७ डिसेंबरला सुरू झाले आणि ९ डिसेंबरपर्यंत लग्न चालले. या लग्नसोहळ्यासाठी इतर बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणेच विकी आणि कतरिनानेही फॅशन डिझायनर सब्यसाचीच्या कपड्यांनाच पसंती दिली. कतरिनाने लाल लेहंगा तर विकीने आयवरी सिल्क शेरवानी परिधान केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT