Katrina Kaif touched Manoj Bajpayee's feet sakal
मनोरंजन

Manoj Bajpayee Birthday: त्यावेळी भर कार्यक्रमात कतरिनाने मनोज वाजपेयीचे पाय धरले होते; कारण..

आज मनोज वाजपेयीचा वाढदिवस, त्या निमित्ताने जाणून घ्या हा खास किस्सा..

नीलेश अडसूळ

Manoj Bajpayee Birthday: सिनेमा विनोदी असो, सस्पेन्स थ्रीलर किंवा एखादा ग्रामीण थरार.. त्याला चपखल न्याय देणारा एक अभिनेता म्हणजे मनोज वाजपेयी. आज मनोजचा अभिनय आणि त्याची कामाची ताकद हे जवळजवळ सगळ्या बॉलीवुडला कळून चुकली आहे.

आज जरी हे नाणं बॉलीवुडमध्ये खणखणीत वाजत असलं तरी एकवेळ अशी होती की मनोजला चित्रपटात कुणी काम देत नव्हतं. पण जेव्हा संधी मिळाली, तेव्हा मनोजने त्याचं सोनं केलं आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

अशा मनोजचा आज 23 एप्रिल रोजी वाढदिवस. आज मनोज आपला 54 वा वाढदिवस साजरा करत आहे. आज या खास निमित्ताने जाणून घेऊया एक खास बात.. ती म्हणजे जेव्हा खुद्द कतरिना मनोज वाजपेयींच्या पाया पडते..

(Katrina Kaif touched Manoj Bajpayee's feet)

बिहारमधील एका लहानश्या गावातून येऊन मनोजने आज बॉलीवूडमध्ये स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. त्याचे चित्रपट असो किंवा वेब सिरिज प्रेक्षकांच्या त्याच्या अभिनयाल कायमच पसंती मिळाली आहे.

पण हे यश सहज मिळालेले नाही. मनोजने इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड स्ट्रगल केला आहे. एक वेळ अशी होती मनोजला कुणीही काम देत नव्हते. दिले तरी अत्यंत छोट्या भूमिका दिल्या जायच्या. जय भूमिकांमधून मनोजला स्वतःला सिद्ध करता येत नव्हते.

त्यावेळी लोक त्याच्याकडे ढुंकूनही बघत नव्हते. एका मुलाखतीत खुद्द मनोजने ही खंत बोलून दाखवली होती. तो म्हणाला होता की, ‘तो एक काळ होता, जेव्हा मीडिया मला जराही भाव द्यायचा नाही. मी कुठल्याही पार्टीला गेलो आणि मीडियाचे कॅमेरे चुकून माझ्याकडे वळले तरी लगेच ते दुस-या बाजूला वळवले जायचे.’

पण राम गोपाल वर्माच्या 'सत्या'ने मनोजचं नशीब बदललं. एक वेगळी ओळख घेऊन तो बॉलीवुडमध्ये गेला. त्याच्या कामाचे कौतुक तर झालेच पण त्याला पुढेही अनेक कामं मिळत गेली.

अमृता प्रीतम यांची गाजलेल्या ‘पिंजर’ या कादंबरीवर आधारित ‘पिंजर’ नावाच्या चित्रपटातही मनोजला उत्त,म संधी मिळाली. यातील भूमिकेसाठी मनोजला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यापुढे त्याच्या यशाचा आलेख हा वर वर चढत गेला आणि त्याचे असंख्य चाहते निर्माण झाले.

आश्चर्य वाटेल पण खुद्द कतरिनाही त्याची मोठी फॅन आहे. तिने मनोज यांनी सर्व कामे पाहिली आहेत. प्रकाश झा यांच्या ‘राजनीति’ या चित्रपटादरम्यान जेव्हा चित्रपटाची सर्व कास्ट एकत्र आली तेव्हा मनोज वाजपेयी यांची एंट्री होताच कतरिना स्वतःहून पुढे गेली आणि मनोजच्या पायांना स्पर्श करत नमस्कार केला आणि म्हणाली, 'याआधी मी आयुष्यात कधीही असा अभिनेता पाहिलेला नाही. ' यावेळी मात्र मनोज अत्यंत विनम्रतेने कतरिनाला मिठी मारली आणि तिचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT