Katrina Kaif Instagram
मनोरंजन

कतरिनाच्या लग्नाच्या मेहंदीचा खर्च ऐकून व्हाल थक्क!

विकी आणि कतरिना राजस्थानमध्ये शाही लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. नुकतच राजकुमार आणि पत्रलेखा हे विवाहबंधनात अडकले आहेत आणि सध्या विकी कौशल आणि कतरिनाच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. तर काही दिवसांपूर्वी त्या दोघांचा साखरपुडा झाल्याचंही बोललं जात आहे. तसेच त्यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. बॉलिवूड लाईफच्या वृत्तानुसार,कतरिनासाठी सोजत मेहंदी जोधपूरच्या पाली भागातून पाठवली जाणार आहे. सोजत हे जगभरात मेहंदीसाठीचं खास स्थान आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विकी आणि कतरिनाच्या लग्नासाठी मेहंदीचा नमुना आधी तपासण्यात आला होता. आता मेहंदीचा नमुना पास झाल्याचं सांगण्यात येत आहे. कतरीनासाठी नैसर्गिकरित्या मेहंदी तयार करत आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारचे रसायन वापरले जाणार नाही. सोजत मेहंदी हाताने तयार करून कतरिनाला पाठवली जाईल. सोजतच्या मेहंदी विक्रेत्याच्या म्हणण्यानुसार, कतरिनाची मेहंदी ही जवळपास ५०हजारांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत आहे, पण व्यापारी तिच्याकडून एकही रुपया घेणार नाही, असं म्हटलं जात आहे.

वृत्तानुसार, रिती-रिवाजाने लग्नकरण्यापूर्वी कतरिना आणि विकी मुंबईमध्ये कोर्ट मॅरेज करणार आहेत. त्यानंतर ते लग्नासाठी राजस्थानला रवाना होणार असून, लग्नाच्या तयारीसाठी त्यांची टीम याची आधीच राजस्थानमध्ये पोहचली आहे. विकी आणि कतरिना राजस्थानमध्ये शाही लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाचे सगळे कार्यक्रम हे ७ ते १२ डिसेंबर दरम्यान होणार आहेत. नुकताचं कतरिनाचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटात कतरिना अक्षयसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. तर दुसरीकडे विकीचा ‘उधम सिंग हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT