katrina kaif world record of 15.3M followers on WhatsApp channel tiger 3 SAKAL
मनोरंजन

Katrina Kaif: मार्क झुकरबर्ग सुद्धा मागे पडला! व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवर सर्वाधिक फॉलोअर्सचा वर्ल्ड रेकॉर्ड कतरिनाच्या नावावर

कतरिना कैफने नवीन रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केलाय

Devendra Jadhav

अगदी काहीच दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल हे नवीन फिचर व्हॉट्सअ‍ॅपवर समाविष्ट झालंय. या फिचर अंतर्गत असंख्य माध्यमांनी, सेलिब्रिटींनी स्वतःचं चॅनल उघडलं आहे. या चॅनलच्या माध्यमातुन आता असंख्य सेलिब्रिटी त्यांच्या आयुष्याबद्दलचे अपडेट्स शेअर करत असतात.

अशातच अभिनेत्री कतरिना कैफने व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवर उघडताच नवा रेकॉर्ड तिच्या नावावर केलाय. जाणुन घ्या सविस्तर.

(katrina kaif world record of 15.3M followers on WhatsApp channel)

कतरीनाने व्हॉट्सअ‍ॅप चॅनल उघडताच तिचे 15.3 मिलियन फॉलोअर्स झाले. त्यामुळे कतरिना कैफ व्हॉट्सअ‍ॅप चॅनलची सर्वाधिक फॉलोअर्स असलेली अभिनेत्री ठरली.

बॉलिवूड स्टार कैटरीना कैफने व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवर एक उल्लेखनीय म्हणजेच 15 मिलीयन फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहे. असा रेकॉर्ड करणारी आणि व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवर सर्वाधिक फॉलो केली जाणारी कतरिना सेलिब्रिटी ठरली आहे. अगदी व्हॉट्सअ‍ॅप कंपनीचे मालक मार्क झुकरबर्ग आणि गायक/रॅपर बॅड बनी यासारख्या जागतिक व्यक्तींना तिने मागे यात मागे टाकलंय.

बॉलीवूडमध्ये तिच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या कतरीना कैफने केवळ तिच्या अभिनयाने लाखो लोकांची मने जिंकली नाहीत तर तिच्या यशस्वी उद्योजकतेमध्येही ती कायमच एक पाऊल पुढे असते.

व्हॉट्सअ‍ॅप चॅनलसाठी झालेले कतरिनाचे फॉलोअर्स हे तिचं किती फॅन फॉलोईंग आहे याचं उदाहरण म्हणून बघता येईल.

कैटरीना ही ब्रँड्समध्ये प्रसिद्ध झाली असून अलीकडेच कतार एअरवेजशी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून तिने हातमिळवणी केली आहे. याशिवाय जपानी फॅशन ब्रँड UNIQLO ची ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.

कतरिना कैफने काही महिन्यांपूर्वी अभिनेता विकी कौशलशी लग्न केलं. विकी आणि कतरिनाचे अनेक फोटो त्यांच्या सोशल मिडीयावर पाहायला मिळतात.

कतरिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर.. ती लवकरच विजय सेथुपती सोबत मेरी ख्रिसमस सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमा १५ डिसेंबर २०२३ ला रिलीज होतोय. याशिवाय यंदाच्या दिवाळीत कतरिना सलमान खान सोबत टायगर 3 मध्ये झळकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Oil Deal: भारतासाठी मोठी खुशखबर! रिफायनरी कंपन्यांना दिलासा, रशियन तेल मिळणार 5 टक्के सवलतीत

Asia Cup 2025 साठी निवड होताच रिंकू सिंग उतरला, पण २० वर्षांच्या गोलंदाजाकडूनच झाला क्लिनबोल्ड; पाहा Video

Rain-Maharashtra Latest Live News Update: मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ दरड कोसळली

Shocking : रोहित शर्मा, विराट कोहली यांची ODI मधून निवृत्ती? ICC ने चाहत्यांना दिला धक्का; नेमकं काय घडलं ते वाचा

Mahabaleshwar News: महाबळेश्वरमध्ये थंडी वाढली; २४ तासांत १७३ मिलिमीटर (७ इंच) पावसाची नोंद

SCROLL FOR NEXT