KBC 15 Esakal
मनोरंजन

KBC 15: 1 कोटी जिंकणारा जसकरण 7 कोटीच्या प्रश्नावर मात्र अडकला! तुम्हाला येईल का 'या' प्रश्नाचं उत्तर?

Vaishali Patil

Kaun Banega Crorepati 15:  गेल्या काही दिवसापासून 'कौन बनेगा करोडपती 15' ची जोरदार चर्चा होती. हा एक क्विझवर आधारित शो आहे. ज्याचे होस्ट हे अमिताभ बच्चन आहेत. हा शो चर्चेत आला तो त्याच्या स्पर्धकामुळे.

या शोच्या 15व्या सिझनला त्यांचा पहिला करोडपती मिळाला आणि तो ही 5 सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिनाच्या दिवशी. अवघ्या 23 वर्षांचा जसकरणने या शोमध्ये एक करोड रुपये जिंकले त्यानंतर त्याला अमिताभ बच्चन यांनी 7 करोडचा प्रश्न विचारला.

मात्र जसकरण हा 7 कोटींच्या प्रश्नावर अडकला आणि या शोचा विजेता होण्याची त्याची संधी हूकली. अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या 7 कोटींच्या प्रश्नाचे उत्तर तो देऊ शकला नाही.

बिग बिंनी त्याला प्रश्न विचारला की पद्मपुराणानुसार कोणत्या राजाला हरणाच्या शापामुळे शंभर वर्षे वाघाच्या रूपात राहावे लागले? यासाठी त्याला पर्याय देण्यात आले होते. या प्रश्नासाठी पर्याय होते, क्षेमधुरि, धर्मदत्त, मीताध्वज की प्रभंजनाय.

या प्रश्नाचे उत्तर जसकरण देऊ शकला नाही. शेवटी त्याने 1 कोटी रुपये जिंकत गेम सोडला. मात्र यावेळी अमिताभ यांनी त्याला उत्तराचा पर्याय काय निवडला असता असं विचारलं तेव्हा त्याने C म्हणजेच मिताध्वज हा पर्याय निवडला मात्र त्याचे उत्तर पर्याय D म्हणजे प्रभंजना होते.

जसकरणने 1 कोटी रुपये जिंकल्यानंतर, बिग बींनी इतर स्पर्धकांसोबत पुढचा खेळ सुरू केला. त्यावेळी 'फास्टेस्ट फिंगर फर्स्ट' मध्ये अश्विनी कुमार ही स्पर्धक हॉट सीटवर पोहचली. आता तिचा खेळ पहाणे मनोरंजक ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT