Pravin Tambe news esakal
मनोरंजन

Kaun Pravin Tambe Trailer: श्रेयस तळपदेचा दमदार अंदाज

बॉलीवूडमध्ये अनेक दिग्गज क्रिकेटपटूंच्या (bollywood actor) आयुष्यावर आधारित चित्रपट निर्मिती करण्यात आली (Entertainment news) आहे.

सकाळ डिजिटल टीम

Bollywood Movies: बॉलीवूडमध्ये अनेक दिग्गज क्रिकेटपटूंच्या (bollywood actor) आयुष्यावर आधारित चित्रपट निर्मिती करण्यात आली (Entertainment news) आहे. त्यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar), महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) , कपिल देव (Kapil Dev) यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटांना नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आता प्रसिद्ध क्रिकेटपटू प्रवीण तांबे यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून त्याचा ट्रेलर आज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे.

अडीच मिनिटांच्या ट्रेलरची सुरुवात मोठ्या आकर्षक पद्धतीनं होते. त्यामध्ये श्रेयस तळपदे हा बॉलिंग करताना दिसतो आहे. त्यानंतर तांबे यांचा संघर्ष दाखवण्यात आला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या ट्रेलरला आतापर्यत नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून तांबे यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची चर्चा आहे. त्यावर वेगवेगळ्या माध्यमातून चर्चाही करण्यात आली आहे. ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना प्रवीण तांबे यांचे वैयक्तिक आयुष्य, त्यामध्ये झालेला संघर्ष, हे प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. श्रेयसनं यापूर्वी इक्बालमधून एका प्रेरणादायी गोलंदाजाची भूमिका केली होती.

प्रवीण तांबे यांचा जन्म 8 जून 1971 मध्ये झाला. त्यांनी वयाच्या 41 व्या वर्षी आयपीएलमध्ये डेब्यु केला होता. ते गुजरात लायन्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैद्राबादच्यावतीनं खेळले आहेत. सर्वप्रथम ते राजस्थान रॉयल्सच्या वतीनं त्यांनी आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तेव्हा त्यांचे वय 41 वर्षे होते. चित्रपटाचा ट्रेलर हा राजस्थान रॉयल्सच्या वतीनं शेयर करण्यात आला आहे. यापूर्वी प्रवीण तांबे यांना मोठा संघर्ष करुन देखील त्यांना कुठल्याही प्रकारची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांच्या नावाची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: 'हेल्थ इन्शुरन्श'बाबत मोठी बातमी! कंपन्यांना मनमानीपणे पैसे उकळता येणार नाहीत; IRDAI कडून हालचाली

Maharashtra Politics: पालघरमध्ये राजकीय उलथापालथ! शिंदे शिवसेनेला खिंडार, बड्या नेत्यासह शेकडो समर्थकांचा भाजपात प्रवेश

Kashi Vishwanath White Owl: काशी विश्वनाथ मंदिरावर पांढऱ्या घुबडाचे दर्शन; जाणून घ्या त्यामागचा अध्यात्मिक संदेश

Asia Cup 2025: मानलं संजू सॅमसन ! तापाने फणफणला होता, उपचार घेऊन हॉस्पिटलमधून थेट मॅच खेळायला आला अन्...

Viral Video : भटक्या कुत्र्यांपेक्षा यांचाच राडा! पोलिसांपुढंच रिलस्टार महिलेनं केला खतरनाक डान्स; नेटकरी म्हणाले तुम्हाला लाज...

SCROLL FOR NEXT