Rishabh Pant Trolled esakal
मनोरंजन

Rishabh Pant Trolled: 'ऋषभ तू मुर्ख...' त्या जाहिरातीवरून प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवतींनी टोचले कान

कौशिकी यांचे ते व्टिट सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

सकाळ डिजिटल टीम

Kaushiki Chakraborty comment on Rishabh Pant advertisement: कौशिकी चक्रवर्ती हे भारतीय शास्त्रीय संगीतातलं मोठं नावं.त्यांच्या गायकीचे केवळ भारतातच नाहीतर जगभरामध्ये मोठ्या संख्येनं चाहते आहेत. आता त्या वेगळ्या कारणासाठी चर्चेत आल्या आहेत. त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतवर आगपाखड केली आहे.

वास्तविक ऋषभ पंतवर टीका करण्याचे कारण ती एक जाहिरात आहे. त्यामध्ये त्यानं आपण जर किक्रेटर झालो नसतो तर काय झालो असतो याविषयी वक्तव्य केलं आहे. त्यात तो एका गायकाच्या भूमिकेतही दाखवला आहे. बऱ्याच दिवसांपासून ही जाहिरात टेलिव्हिजन आणि सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसते आहे. आता त्याकडे कौशिकी चक्रवर्ती यांचे लक्ष गेले आहे. त्यांनी ऋषभवर टीका केली आहे.

हेही वाचा- Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

कौशिकी यांचे ते व्टिट सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. मी जेव्हा ती जाहिरात पाहिली तेव्हा खूपच अस्वस्थ झाले. माझ्याकडे त्याविषयी बोलायला शब्दच नाही. आपण आपल्या महान परंपरा लाभलेल्या संस्कृतीचा अपमान कशाप्रकारे करु शकतो. त्या जाहिरातीमध्ये खूपच ओंगळवाण्या पद्धतीनं आपल्या शास्त्रीय संगीताचा अपमान करण्यात आला आहे. हे असं करणं म्हणजे आपण किती मुर्ख आहोत हे दाखवून देतो आहे.

कौशिकी यांच्या त्या व्टिटनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. त्या जाहिरातीमध्ये जे संगीत वापरण्यात आले आहे ते पंडित रवी शंकर यांचे आहे. त्यात उस्ताद झाकीर हुसैन, पंडित भीमसेन जोशी यांचाही वाटा आहे. कुणाचे सूर, ताल आणि लय त्यात आहे. तेव्हा आपण अशाप्रकारे जाहिरात करुन काय साध्य करतो आहोत असा प्रश्नही कौशिकी यांनी विचारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

SCROLL FOR NEXT