amitabh 
मनोरंजन

'केबीसी 12' च्या सेटवर स्पर्धकाने बिग बींकडे मुलीचं नामकरण करण्याची केली विनंती

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- ‘कौन बनेगा करोडपती' हा स्मॉल स्क्रीनवरील प्रेक्षकांचा आवडता शो. लॉकडाऊनमध्ये अनेकांंना यंदाच्या सिझनची उत्सुकता होती. या शोच्या माध्यमातून चाहत्यांना बिग बींना भेटण्याची संधी मिळते. शोमधील प्रश्न उत्तराच्या खेळासोबतंच बिग बी यांच्याशी संबंधित अनेक किस्से शेअर करत असतात. हॉट सीटवर बसलेला स्पर्धक आणि अमिताभ बच्चन यांच्यामध्ये हा खेळ देखील कोणतंही प्रेशर न घेता मजा मस्ती करत खेळला जातो. यात अनेकदा चाहते बिग बींना विनंती करुन त्यांच्याकडून काही इच्छा पूर्ण करुन घेतअसतात. असंच काहीसं केबीसी 12 च्या सेटवर घडलंय.   

केबीसीच्या एका भागामध्ये स्पर्धकाने बिग बींना चक्क त्याच्या मुलीचं नामकरण करायला सांगितलं. केबीसीमध्ये सनी खलास हे स्पर्धक म्हणून हॉट सीटवर बसले होते. त्यांनी फास्टेस्ट फिंगर फस्टमध्ये सगळ्यात आधी उत्तर दिलं. त्यानंतर त्यांनी त्यांची ओळख करुन देताना कुटुंबाविषयी माहिती दिली. शोमध्ये येण्याच्या एक दिवस आधी सनी आणि त्यांच्या पत्नीला कन्यारत्न झाली होती.. त्यामुळे सनी यांनी अमिताभ यांना तिचं नामकरण करण्याची विनंती केली.

यावर अमिताभ बच्चन यांनी सनी आणि त्यांच्या पत्नीला शुभेच्छा देत दिवाळीच्या आधी तुमच्या घरी लक्ष्मीचे आगमन झालं असं म्हणत शुभेच्छा दिल्या. सनी यांच्या खेळाविषयी सांगायचं झालं तर त्यांनी ३ लाख २० हजार रुपयांच्या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित नसल्यामुळे गेम सोडण्याचा निर्णय घेतला त्यामुळे ते १ लाख ६० हजार रुपये एवढी रक्कम जिंकू शकले. 

kbc 12 contestant asked amitabh bachchan to name his newborn girl  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT