big b kbc team e sakal
मनोरंजन

KBC 14: 'आयुष्यातील कोणती गोष्ट बदलायला आवडेल'? बिग बीं नी दिलं उत्तर

टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध शो कौन बनेगा करोडपतीची लोकप्रियता साऱ्या देशात आहे.

सकाळ डिजिटल टीम

KBC 14 Monday Full Episode: टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध शो कौन बनेगा करोडपतीची लोकप्रियता साऱ्या देशात आहे. भारतीय मनोरंजन विश्वामध्ये या मालिकेनं आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ या रियॅलिटी शो ने पुन्हा एकदा वेगळेपण सिद्ध केले आहे. यासगळ्यात मोठा वाटा आहे तो महानायक अमिताभ बच्चन यांचा. त्यांनी केलेल्या होस्टिंगमुळेच तर या कार्यक्रमाची उंची वाढली आहे.

कौन बनेगा करोडपतीमध्ये हॉट सीटवर बसण्यात स्पर्धकांना जेवढा आनंद होतो त्यापेक्षा सर्वाधिक आनंद हा त्यांना अमिताभ बच्चन यांना भेटून होतो. त्यामुळे कित्येकांनी आपली प्रतिक्रिया देताना भावूक झाल्याचे सांगितले आहे. कित्येक स्पर्धक अमिताभ यांना पाहून भारावून जातात. त्यांना काय बोलावे, काय विचारावे असे होऊन जाते. असाच एक प्रसंग समोर आला आहे. त्यामध्ये एका स्पर्धकानं अमिताभ यांना विचारलेला प्रश्न हा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. तुम्हाला तुमच्या आय़ुष्यात कोणती गोष्ट बदलायला आवडेल असा प्रश्न त्यांना विचारला होता.

कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर अमिताभ यांची प्रमुख भूमिका असलेला उंचाई नावाच्या चित्रपटाची टीम आली होती. या चित्रपटामध्ये अनुपम खेर, नीना गुप्ता यांच्यासहित अनेकांच्या प्रमुख भूमिका आहेत. यावेळी अमिताभ यांच्याऐवजी त्यांच्यासमोर बसलेल्या पाहुण्या स्पर्धकांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नांची अधिक चर्चा होती. बोमन इराणी, रीना दत्ता यांनी देखील या शोमध्ये खूप मस्ती केल्याचे दिसून आले.

याप्रसंगी गुप्ता यांनी विचारलेल्या एका प्रश्नानं अमिताभ थोडा वेळ भावूक झाल्याचे दिसून आले. तो प्रश्न असा की, तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणती गोष्ट बदलायला आवडेल, अमिताभ म्हणाले, मला काहीही बदलायचे नाही. यापेक्षा जे सुरु आहे तेच नव्यानं जगायला मला आवडेल. असे अमिताभ म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT