Kaun Banega Crorepati Latest News
Kaun Banega Crorepati Latest News Kaun Banega Crorepati Latest News
मनोरंजन

KBC 14 : ... अन् अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकाचे १० रुपये व्याजासह केले परत

सकाळ डिजिटल टीम

Kaun Banega Crorepati : कौन बनेगा करोडपती १४ च्या अलीकडील एपिसोडमध्ये प्राध्यापक धुलीचंद अग्रवाल हॉट सीटवर बसले आहे. ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ जिंकल्यानंतर त्यांनी स्टेजच्या तीन फेऱ्या मारल्या. केबीसीच्या सेट्सचे मंदिर असे वर्णन करून त्यांनी २१ वर्षांपासून या मंचावर येण्याचे स्वप्न पाहत असल्याचे सांगितले. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि धुलीचंद यांच्यातील संभाषण खूपच मनोरंजक आणि मजेदार होते.

धुलीचंद अग्रवाल यांनी संवादादरम्यान अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना सांगितले की, त्यांना १० रुपये देणे बाकी आहे. मला ‘मुकद्दर का सिकंदर’ चित्रपट पाहायचा होता. मी कसे तरी १० रुपये वाचवले आणि हे पैसे चित्रपट पाहण्यासाठी कसे पुरेल याचा हिशोब लावून बरेच मैल चालत गेलो. मी १० रुपये घेऊन तासनतास रांगेत उभे राहिलो. जोपर्यंत माझा नंबर आला तोपर्यंत बॉक्स ऑफिसची खिडकी बंद झाली होती, असे धुलीचंद अग्रवाल यांनी सांगितले.

तिकिटांसाठी झालेली गर्दी आणि चेंगराचेंगरीमुळे (Stampede) पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने जमावात मोठी बाचाबाची झाली. मी जमिनीवर पडलो आणि डोक्याला मार लागला. त्यादिवशी शपथ घेतली की, अमिताभ बच्चन यांचा चित्रपट पुन्हा कधीही पाहणार नाही. तसेच प्रार्थना केली की एक दिवस बच्चन यांच्यासमोर बसून ही गोष्ट सांगू शकेन आणि कधीतरी त्यांच्यासोबत बसून हा चित्रपट पाहावा अशी इच्छा आहे.

सोबत चित्रपट पाहण्याचे आश्वासन

यानंतर अमिताभ बच्चन यांनी प्राध्यापक धुलीचंद अग्रवाल यांना १० रुपयांची नोट दिली आणि सांगितले की ते त्यांचे पैसे व्याजासह परत करीत आहे. बिग बींनी वचन दिले की ते त्यांच्यासोबत चित्रपट नक्कीच पाहतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; सीबीआय तपासाची केली मागणी

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT