KBC Latest Episod News KBC Latest Episod News
मनोरंजन

KBC : २१ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर स्पर्धक ‘हॉट सीट’वर; जिंकणार ७५ लाख?

धुलीचंद अग्रवाल यांनी केबीसीच्या मंचावर येण्यासाठी २१ वर्ष साधना केली

सकाळ डिजिटल टीम

KBC Latest Episod News ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) या लोकप्रिय क्विझ शोने रविवारी धमाका केला. १४ व्या हंगामाच्या आगामी एपिसोडमध्ये ‘धन अमृत’चे दार उघडणार आहे. म्हणजे पहिल्यांदाच ७५ लाखांचा प्रश्न दोन स्पर्धकांसमोर असेल. या प्रश्नाचे अचूक उत्तर दिल्यास ते ७५ लाख जिंकतील. तसेच उत्तर चुकीचे निघाले तर ते थेट ३ लाख २० हजारांवर पोहोचतील.

दोन स्पर्धकांचा प्रवास दाखवणारे शोचे नवीन प्रोमो (KBC) समोर आले आहे. एक स्पर्धक प्राध्यापक धुलीचंद अग्रवाल तर दुसरे सॉफ्टवेअर अभियंता श्रुती डागा आहे. महत्त्वाचे म्हणजे दोघेही पहिल्याच एपिसोडमध्ये १५ व्या प्रश्नापर्यंत पोहोचले आहेत. ते अमृत संपत्तीचे (धन अमृत) दार उघडणार आहेत. खेळाच्या या टप्प्यावर हे दोन स्पर्धक योग्य उत्तर देऊ शकतील का? यासाठी अजून काही तास वाट पाहावी लागणार आहे.

स्पर्धक धुलीचंद अग्रवाल हे क्विझ शोमध्ये येण्यासाठी बराच वेळ वाट पाहत होते. केबीसीच्या मंचावर येण्यासाठी त्यांनी २१ वर्ष साधना केली. ते कधीही केबीसी खेळले नाही पण जगले आहे. केबीसी शो प्रती अशी आवड पाहून अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हेही प्रभावित झाले.

धुलीचंद यांनी आपल्या ती लाइफ लाइन गमावून ५० लाख जिंकले आहे. आता ते अमृत संपत्तीच्या पंधराव्या प्रश्नापर्यंत पोहोचले आहे. दुसरी स्पर्धक श्रुती डागा १५ व्या प्रश्नापर्यंत पोहोचली आहे. तिने तिच्या कुटुंबाला डिस्क्लेमर दिला आहे. उत्तर चुकले तरी काही फरक पडणार नाही. सगळं व्यवस्थित होईल, असे तिने सांगितले.

आगामी एपिसोडच्या या प्रोमोजनी चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. पहिल्याच भागात अप्रतिम साहस पाहायला मिळणार आहे. रविवारी या शोचा प्रीमियर झाला. सुपरस्टार अमीर खान लॉन्च एपिसोडमध्ये पाहुणा म्हणून आला होता. शोमध्ये अमीर आणि बिग बी यांनी प्रश्नोत्तराच्या दरम्यान अनेक मजेशीर गोष्टीही केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT