amitabh sachin khedekar 
मनोरंजन

अमिताभ बच्चन-सचिन खेडेकर यांची 'ग्रेट भेट'

बिग बींकडून 'कोण होणार करोडपती'चं कौतुक

स्वाती वेमूल

'कोण होणार करोडपती'चा Kon Honaar Crorepati नवीन सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नव्या सिझनचं सूत्रसंचालन अभिनेते सचिन खेडेकर Sachin Khedekar करत आहेत. तर दुसरीकडे 'कौन बनेगा करोडपती' या हिंदी शोच्या शूटिंगलाही नुकतीच सुरुवात झाली आहे. या दोन्ही शोजची शूटिंग मुंबईतील फिल्म सिटीमध्ये होत आहे. केबीसीच्या सेटच्या शेजारीच 'कोण होणार करोडपती'चं सेट आहे. ही गोष्ट जेव्हा अमिताभ बच्चन Amitabh Bachchan यांना समजली, तेव्हा ते सेटवर सचिन खेडेकर यांची भेट घेण्यास गेले. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही कार्यक्रमांचे सूत्रसंचालक यावेळी एकाच मंचावर पहायला मिळाले.

सचिन खेडेकर आणि अमिताभ बच्चन यांची भेट झाली, तेव्हा बिग बींनी 'कोण होणार करोडपती'चं भरभरून कौतुक केलं आणि हा कार्यक्रम पाहिल्याचा आवर्जून उल्लेख केला. 'कौन बनेगा करोडपती' हा शो येत्या २३ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तेराव्या सिझनसाठी सेट आणि शोच्या संकल्पनेत काही बदल करण्यात आले आहेत. हिंदीतील शोचं सूत्रसंचालन महानायक अमिताभ बच्चन करणार असून मराठी शोचं सूत्रसंचालन सचिन खेडेकर करत आहेत.

'कोण होणार करोडपती' या शो प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. आतापर्यंत नाना पाटेकर, मनोज वाजपेयी, सयाजी शिंदे, जितेंद्र जोशी, भास्करराव पेरे पाटील यांनी शोमध्ये हजेरी लावली. सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता हा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होतो. याआधी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी 'कोण होणार करोडपती'चं सूत्रसंचालन केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT