kbc marathi priyanka barve and bhimrao panchale join the show host by sachin khedekar SAKAL
मनोरंजन

KBC मराठीमध्ये भीमराव पांचाळे आणि प्रियंका बर्वे, प्रश्नांसोबत रंगणार सुरेल संगीताची मेजवानी

KBC च्या विशेष भागात ग़ज़लनवाज़ भीमराव पांचाळे आणि गायिका प्रियंका बर्वे यांच्याशी गप्पा रंगणार आहेत

Devendra Jadhav

KBC Marathi News: जनसामान्यांमध्ये लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे 'कोण होणार करोडपती'! सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन हे या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य. या आठवड्यात ग़ज़लनवाज़ भीमराव पांचाळे आणि गायिका प्रियंका बर्वे हॉट सीटवर येणार आहेत.

‘कोण होणार करोडपती’मध्ये ते ग़ज़ल सागर प्रतिष्ठान या संस्थेसाठी खेळणार आहेत. या पर्वातील हा विशेष भाग असणार आहे आणि या भागात ग़ज़लनवाज़ भीमराव पांचाळे आणि गायिका प्रियंका बर्वे यांच्याशी गप्पा रंगणार आहेत.

(kbc marathi priyanka barve and bhimrao panchale join the show host by sachin khedekar)

गुलजार यांनी दिली प्रियंकाला दाद

ग़ज़लनवाज़ भीमराव पांचाळे यांनी त्यांच्या सुरेल आवाजात ग़ज़ल सादर करून या विशेष भागाची सुरुवात केली. या विशेष भागात भीमराव पांचाळे आणि प्रियंका बर्वे यांनी त्यांच्या कारकिर्दीतील धमाल किस्से सांगितले.

प्रियांका बर्वे यांनी चक्क गुलजार यांच्याकडून मिळालेली दाद आणि तो संपूर्ण किस्सा सांगितला आणि ती ग़जलही सादर केली.

प्रियांका बर्वे आणि मुगल-ए-आज़म

या वेळी भीमराव पांचाळे आणि सचिन खेडेकर यांच्या गप्पा कमाल रंगल्या. भीमराव यांच्या गाजलेल्या सुंदर ग़ज़लेने, 'वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे' या ग़ज़लेने, या विशेष भागाची सुरुवात झाली. करोडपतीचा हा खेळ भीमराव पांचाळे आणि प्रियंका बर्वे खेळणार आहेत.

सचिन खेडेकर यांच्याबरोबर भीमराव पांचाळे आणि प्रियंका बर्वे यांच्या सुंदर गप्पा रंगणार आहेत. प्रियांका बर्वे यांनी मुगल-ए-आज़म करतानाचे काही किस्से सांगितले.

मुगल-ए-आज़ममधील 'प्यार किया तो डरना क्या' हे सुरेल गीत सादर केले. त्याबरोबरच सचिन खेडेकरांनीही ते मुगल-ए-आज़म बघायला जायचे तेव्हाचा किस्सा सांगितला.

जिंकलेली रक्कम या ठिकाणी वापरणार

ग़ज़लनवाज़ भीमराव पांचाळे आणि गायिका प्रियंका बर्वे यांचा सहभाग असलेला 'कोण होणार करोडपती'चा हा विशेष भाग २९ जुलै रोजी रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळेल. जिंकलेली रक्कम ते ग़ज़ल सागर प्रतिष्ठान या संस्थेला देणार आहेत.

ग़ज़ल सागर प्रतिष्ठानसाठी खेळताना 'कोण होणार करोडपाती'च्या खेळात ते किती रक्कत जिंकतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. 'कोण होणार करोडपती' चा हा विशेष भाग शनिवार २९ जुलै रात्री ९ वाजता सोनी मराठीवर बघायला मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

रात्री बसमध्ये झोपलेली, सीटच्या मागून कमरेत हात; सई ताम्हणकरने तोच हात पकडला आणि... स्वतः सांगितला तो प्रसंग

Agricultural Crime : रात्रीतून फळबागेतील डाळिंब लंपास चौसाळ्यातील घटना, गुन्हा नोंदविण्यासाठी वजन-किमतीचा मुद्दा ठरतोय कळीचा

Video : "यापेक्षा कार्टून बरं" जानकी-हृषीकेशमध्ये येणार दुरावा ; घरोघरी मातीच्या चुलीवर प्रेक्षक वैतागले

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

SCROLL FOR NEXT