ke dil abhi bhara nahi marathi dramas 250th performance
ke dil abhi bhara nahi marathi dramas 250th performance  
मनोरंजन

'के दिल अभी भरा नही' ची 250 व्या प्रयोगाकडे वाटचाल 

सकाळवृत्तसेवा

उतार वयातील जोडप्यांची भावनिक कथा मांडणारे नाटक मंडळी निर्मित 'के दिल अभी भरा नही' हे विनोदी नाटक लवकरच 250 व्या प्रयोगाकडे वाटचाल करत आहे. 19 मे ला बोरीवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह येथे दुपारी 4 वाजता हा प्रयोग संपन्न होणार असून सिनेसृष्टीतील काही प्रसिद्ध जोड्या या वेळी उपस्थित राहणार आहेत. मंगेश कदम दिग्दर्शित आणि शेखर ढवळीकर लिखित या नाटकाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. 

वयाची पन्नाशी गाठल्यानंतर नवऱ्या-बायकोत उडणारे छोटे, मोठे, आंबट, गोड खटके, इतकी वर्षं संसार केल्याने नात्यात आलेली परिपक्वता, सुखदुःखात एकमेकांना दिलेली साथ थोड्याबहुत प्रमाणात प्रत्येक घरात पाहायला मिळते. प्रत्येक घरातील या खऱ्या आयुष्याचा वेध घेणारे 'के दिल अभी भरा नही' हे नाटक म्हणूनच प्रेक्षकांना अधिक जवळचे वाटते. lतसेच या नाटकात नवरा बायकोच्या उतारवयातील नात्यावर भाष्य केले आहे.

250 वा प्रयोग पाचशेपर्यंत यशस्वीपणे पोहोचवण्याच्या हेतूने या नाटकाच्या सादरीकरणात काही बदल करण्यात आले आहेत. अर्थात नाटकाचा गाभा तोच राहणार आहे. लीना भागवत आणि मंगेश कदम यांच्या सहज, सुंदर अभिनयाने या नाटकाला चारचाँद लावले आहेत. याव्यतिरिक्त या नाटकात चंद्रशेखर कुलकर्णी, बागेश्री जोशीराव यांनीही प्रमुख भूमिका केल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT