Maharashtra Shaheer, Maharashtra Shaheer news, Maharashtra Shaheer songs, TDM, TDM songs SAKAL
मनोरंजन

Maharashtra Shaheer ला टक्कर देणार 'TDM'? मराठी सिनेमांची बॉक्स ऑफिसवर मोठी लढत. कोण मारणार बाजी?

२८ एप्रिलला महाराष्ट्र शाहीर आणि TDM या सिनेमांची बॉक्स ऑफिसवर मोठी लढत बघायला मिळणार आहे

Devendra Jadhav

Maharashtra Shaheer vs TDM News: मराठी सिनेमांची होणारी टक्कर बॉक्स ऑफिसवर नवीन नाही.

अनेकदा चार - पाच मराठी सिनेमे एकत्र बॉक्स ऑफिसवर टक्कर देत असतात. अशीच एक मोठी लढत उद्या म्हणजेच २८ एप्रिलला मराठी सिनेमांची होणार आहे.

ती म्हणजे महाराष्ट्र शाहीर आणि TDM. हे दोन्ही बडे सिनेमे उद्या २८ एप्रिलला रिलीज होत आहेत. या दोन सिनेमांपैकी बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

(kedar shinde maharashtra shaheer and bhaurao karhade tdm box office clash)

हेही वाचा: Types of Vedas: वेदांचे प्रकार

महाराष्ट्र शाहीर सिनेमाची गेली अनेक वर्ष प्रेक्षकांना उत्सुकता आहे. केदार शिंदे या सिनेमाचा गेली ५ वर्ष अभ्यास करत होते.

गाढा अभ्यास करून या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली. आणि अखेर हा सिनेमा उद्या २८ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय.

अंकुश चौधरी शाहीर साबळेंची भूमिका साकारत आहे. त्यामुळे सर्वांना या सिनेमाची उत्सुकता आहे.

तर दुसरीकडे प्रसिद्ध दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या टीडीएम नावाच्या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे.

काहीच दिवसांपूर्वी आलेल्या TDM च्या ट्रेलरने यु ट्यूब वर धुमाकूळ केला. रोमँटिक आणि ऍक्शनचा तडका असलेला 'ख्वाडा', 'बबन'नंतर भाऊराव कऱ्हाडेंचा तिसरा सिनेमा म्हणजे 'TDM'.

२८ एप्रिलला TDM प्रदर्शित होतो आहे. टीडीएम चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.

असा अंदाज लावण्यात येत आहे की, केदार शिंदे आणि अंकुश चौधरी यांच्या महाराष्ट्र शाहीर सिनेमाला TDM तगडी टक्कर देईल. ग्रामीण भागात TDM ची मोठी हवा आहे.

त्यामुळे महाराष्ट्र शाहीर बिग बजेट सिनेमा असला तरीही ग्रामीण भागात TDM सोबत महाराष्ट्र शाहीर सिनेमाची तुल्यबळ लढत होईल यात शंका नाही.

TDM सिनेमाला ग्रामीण भागाची पार्श्वभूमी आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील जनता सिनेमाला डोक्यावर घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohammad Shami ने पहिल्याच रणजी सामन्यात घेतल्या ७ विकेट्स अन् मग अजित आगरकरला दिलं उत्तर; म्हणाला, 'त्यांना काय म्हणायचं ते...'

Banke Bihari Temple Treasure Open: तब्बल पाच दशकांपेक्षाही अधिक काळानंतर उघडला ''भगवान बांके बिहारी''चा रहस्यमयी खजाना!

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये कोणाच्याही प्रवासावर कोणतेही बंधन नाही - राम कदम

रांगोळी पहिल्यांदा कधी बनवली गेली? वैदिक-पौराणिक संबंध काय? जाणून घ्या कधीही न ऐकलेला इतिहास

Jalgaon News : सुरक्षितता हीच खरी दिवाळी! बाहेरगावी जाताय, सोने-रोख रक्कम लॉकरमध्ये ठेवा; पोलिसांनी सांगितल्या सुरक्षेच्या महत्त्वाच्या टिप्स

SCROLL FOR NEXT