kedar shinde uddhav thackeray 
मनोरंजन

'कोरोनाची सुरूवात कलाकारांनी केली की काय?', केदार शिंदेचा ठाकरे सरकारला टोला

सिनेमागृह, नाट्यगृह याविषयी एक चकार शब्द नाही, असं म्हणत केदार शिंदेने व्यक्त केला संताप

स्वाती वेमूल

लशीचे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्यांना रेल्वे प्रवासास परवानगी देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी रविवारी केली. मात्र त्यासाठी लशीचे दोन डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झाल्याची अट आहे. एकीकडे या निर्णयाची सर्वत्र चर्चा होत असताना निर्माता, दिग्दर्शक केदार शिंदेच्या Kedar Shinde पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. 'ट्रेन प्रवास सुरू होणार पण सिनेमागृह, नाट्यगृह याविषयी चकार शब्द नाही', असं म्हणत त्याने सरकारला टोला लगावला. कलाकारांचे कोणीच वाली नाही, अशी खंतही त्याने या पोस्टमध्ये व्यक्त केली.

केदार शिंदेची पोस्ट-

'दोन डोस घेतलेल्यांना ट्रेन प्रवास सुरू होणार. पण सिनेमागृह, नाट्यगृह याविषयी एक चकार शब्द नाही. या कोरोनाची सुरूवात आम्ही कलाकारांनी केली की काय, असं वाटू लागलं आहे. आमचे कोणीच वाली नाही. आमच्या वाट्याला सगळे सुग्रीवच!', अशी पोस्ट केदार शिंदेने लिहिली आहे.

'फक्त नाटकाच्या थिएटर्समध्येच कोरोना आहे का?'; उमेश कामतचा सवाल

याआधी इतरही मराठी कलाकारांनी नाट्यगृहांविषयीचा मुद्दा मांडला होता. आजूबाजूला पाहिल्यास सर्व गोष्टी सुरू झाल्या आहेत, फक्त नाटक इंडस्ट्री थांबली आहे. फक्त नाटकाच्या थिएटर्समध्येच कोरोना आहे का, असा सवाल अभिनेता उमेश कामतने उपस्थित केला होता. इतर व्यवसायांसाठी जसं वेळेचं बंधन आणि नियम-अटींचं पालन करत परवानगी देण्यात आली आहे. तसंच नाटकांच्या बाबतीत विचार करावा, असं त्याने म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kukadi Project : ‘कुकडी’त उच्चांकी ९३ टक्के पाणीसाठा; प्रकल्पातील धरणे भरल्याने रब्बी हंगामाची मिटली चिंता

Manchar News : उसनवारीच्या धान्यावर भूक भागविण्याची वेळ; आंबेगाव तालुक्यात २२ शाळांचा पुरवठा रखडला

Power Shake-Up in Shirur: शिरूर नगर परिषदेत सत्ताधारी गटाला तडे; शरद पवार गटाचे पाच नगरसेवक बाहेर पडल्याने समीकरणे बदलण्याची शक्यता

PNG Connection : चार लाख सदनिकांना महिनाभरात ‘पीएनजी’ जोडणी अनिवार्य

Rural Heart Attack Care : मंचर उपजिल्हा रुग्णालयातील तातडीच्या ‘थ्रॉम्बोलिसिस’ उपचाराने शेतकऱ्याचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT