kedar shinde posted memory of shahir sabale's journey
kedar shinde posted memory of shahir sabale's journey  sakal
मनोरंजन

'कष्ट केले की दिवस पालटतातच..' केदार शिंदे यांची खास पोस्ट 'प्रवास'..

नीलेश अडसूळ

शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे (shahir sable) म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे. शाहीर साबळे यांच्या गाण्यांवर महाराष्ट्रानेच नाही तर जगाने प्रेम केलं. त्यांचं महाराष्ट्र गीत असो, खंडोबाचा जागर किंवा कोळी गीत.. प्रत्येकच गाणं हे माणसाच्या काळजात हात घालणारं. शाहीर साबळे यांनी महाराष्ट्राला दिलेली 'महाराष्ट्राची लोकधारा' आजही अनेकांच्या स्मरणात आहे. शाहीर साबळे यांच्या पश्चात हा वारसा त्यांचा नातू म्हणजेच दिग्दर्शक केदार शिंदे पुढे नेत आहेत आणि आता तर शाहीर साबळे यांच्या जीवनावर ते चित्रपट करत आहेत. (Maharashtra Shahir Movie Updates) पुढच्या वर्षी म्हणजे २८ एप्रिल २०२३ रे ओजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. पण या निमित्ताने दिग्दर्शक केदार शिंदे (kedar shinde) रोज काही आठवणी चाहत्यांसोबत शेअर करत आहे.

या चित्रपटात अंकुश चौधरी (ankush chaudhari )हा शाहीर साबळे यांची भूमिका करणार आहेत, तर अजय अतुल (ajay atul) यांचे बहारदार संगीत या चित्रपटाला लाभले असून या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. सध्या केदार शिंदे शाहीर साबळे रोज यांचा लोककलेतील प्रवास, काही आठवणी शेअर करत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता अधिकच वाढली आहे. यावेळी केदार यांनी 'प्रवास..' अशी एक पोस्ट शेअर केली आहे.

त्यामध्ये ते म्हणतात, 'काळ कीती झपाट्याने बदलत जातो नाही! एक काळ होता अगदी स्वातंत्र्य मीळाल्या नंतर लगेचचा..अजुन गावोगावी धड रस्ते झाले नव्हते, प्रवासाची साधनं खेड्यापाड्यात पोचली नव्हती आणि मुळात म्हणजे वीज अजुनही शहरी भागांनाच दिपवत होती तो काळ..शाहीर साबळे म्हणजे आमचे बाबा तोवर खेड्यापाड्यातच कार्यक्रम करत असत..कधी दहा,बारा कोसाच अंतर असे तर कधी पंधरा,वीस कोसाचही मग धुळभरल्या रस्त्यावरचा वाद्य डोक्यावर,हाता,खांद्यावर अडकवून कीत्येक कोसांचा पायी प्रवास सुरु व्हायचा.. कीत्येक ठीकाणी कार्यक्रमानंतर मीळणारं जेवण हीच बीदागी असायची पण तरुण वय होत त्यामुळे काही करुन दाखवायची मनात जीद्द होती..कधी रस्ता चुकला तर चार,पाच कोस अजुन पायपीट व्हायची..'

पुढे ते म्हणतात, 'पण कष्ट केले की दिवस पलटतातच..लवकरच शाहीरांनी मुंबईत बस्तान बसवल आणि एक सेकंडहँण्ड गाडी वीकत घेतली..मधे मधे बंद पडणारी,धक्का द्यावा लागणारी..खर तर शाहीर उत्तम ड्रायव्हर होते ते ड्रायव्हींग कसे शीकले हा संशोधनाचा विषय आहे पण तरीही त्यांनी गाडीवर मुणगेकर नावाचे ड्रायव्हर ठेवले होते...पुढे आयुष्यात त्यांनी बर्याच नव्याकोर्या गाड्या घेतल्या...जीप हा त्यांचा गाड्यांमधला आवडता प्रकार..बरीच वर्ष त्यांनी जीपमधून सर्व कलावंतासह महाराष्ट्र पींजून काढला..पुढे नवीकोरी चेसी घेऊन त्यावर पस्तीस सीटर आरामबस पण बनवून घेतली...त्यानंतर लोकधारा करताना नव्या २४ सीटर गाडीतून ४० कलावंत बसवून परत महाराष्ट्रभर फीरले..पण तरीही त्यांच्या आठवणीत शेवटपर्यंत राहीला हा पायपीट करत केलेला प्रवास...त्यावेळी हातावर भाकरी घेऊन केलेल जेवण, पाटाच्या पाण्यात धुळीने माखलेले हातपाय धूण आणि सतत गाऊन बसलेला आवाज सुटण्यासाठी जेष्ठमध,कंकोळ वगैरे औषध घेण्यासाठी त्यांच्या राजेंद्र बावीसकर या सुशिक्षीत मीत्राने प्रेक्षकांसमोर पैशासाठी पसरलेला हात...' अशी काहीशी भावनिक आणि तितकीच प्रेरणादायी पोस्ट केदार शिंदे यांनी शेअर केली आहे. ही पोस्ट वसुंधरा साबळे यांनी लिहिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: लॉकी फर्ग्युसनने तोडली रचिन-रहाणेची पार्टनरशीप, चेन्नईला तिसरा धक्का

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT