'प्रत्येक जण मला विचारतोय..' अंकुश चौधरीबाबत केदार शिंदे काय म्हणाले? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kedar shinde gives reason for choosing ankush chaudhari as shahir sable in maharashtra shahir movie

'प्रत्येक जण मला विचारतोय..' अंकुश चौधरीबाबत केदार शिंदे काय म्हणाले?

शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे (shahir sable) म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे. शाहीर साबळे यांच्या गाण्यांवर महाराष्ट्रानेच नाही तर जगाने प्रेम केलं. त्यांचं महाराष्ट्र गीत असो, खंडोबाचा जागर किंवा कोळी गीत.. प्रत्येकच गाणं हे माणसाच्या काळजात हात घालणारं. शाहीर साबळे यांनी महाराष्ट्राला दिलेली 'महाराष्ट्राची लोकधारा' आजही अनेकांच्या स्मरणात आहे. शाहीर साबळे यांच्या पश्चात हा वारसा त्यांचा नातू म्हणजेच दिग्दर्शक केदार शिंदे पुढे नेत आहेत आणि आता तर शाहीर साबळे यांच्या जीवनावर ते चित्रपट करत आहेत. (Maharashtra Shahir Movie Updates)

हेही वाचा: Sakal exclusive : हेमंत ढोमेने उडवली पालिकेची झोप, म्हणाला किशोरीताई..

या चित्रपटात शाहीर साबळे यांची भूमिका अभिनेता अंकुश चौधरी साकारत आहे. पण अंकुश चौधरीच का, असा प्रश्न केदार शिंदे अण्णा वारंवार विचारला जात आहे. यावर अखेर दिग्दर्शक केदार शिंदे (kedar shinde) यांनी स्पष्टोक्ती दिली आहे. शाहीर साबळे आणि शाहीर साबळे यांच्या भूमिकेतील अंकुश चौधरी या दोघांचा एकत्र फोटो त्यांनी शेअर केला आहे.

हेही वाचा: प्रसाद ओक म्हणाला,'आपल्याकडे एकमेकांचं भलं झालेलं पाहू शकणारी माणसंच नाहीत'

या फोटोवर त्यांनी लिहिले आहे की, 'प्रत्येक जण मला विचारतोय की अंकुश चौधरी महाराष्ट्र शाहीर या भूमिकेसाठी कसा योग्य आहे? तो खुप वेगळा दिसतो. काहींनी हे पोस्टर पाहून अंकुशला ओळखलं सुध्दा नाही. नीट पाहा. एक फोटो अंकुश चा आहे आणि दुसरा शाहीर साबळे यांचा!! ही कमाल दी विक्रम गायकवाड टीम यांची… जगदीश येरे यांच्याकडून हा लूक निर्माण झाला आहे. युगेशा हीने कॉस्च्युम केले आहेत…लोक स्टुडिओ यांनी या सिनेमाचं पोस्टर डिझाईन केलं आहे. ही सुरूवात आहे. अजून बराच पल्ला आम्हाला गाठायचा आहे. पण प्रत्येक गोष्ट याच पॅशनने करून हे शिवधनुष्य आम्ही नक्कीच पेलू. आपले आशीर्वाद असू द्यात. श्री स्वामी समर्थ.'

हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची पटकथा व संवाद प्रतिमा कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. या चित्रपटातील संगीत अजय- अतुल करणार असून चित्रपटाचे पोस्टरचे अनावरण राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: Kedar Shinde Gives Reason For Choosing Ankush Chaudhari As Shahir Sable In Maharashtra Shahir Movie

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top