kedar shinde on uddhav thackeray
kedar shinde on uddhav thackeray  sakal
मनोरंजन

'पडदा सरकला, नाटक सुरू..' राजकीय गदारोळावर काय म्हणाले केदार शिंदे..

नीलेश अडसूळ

cm uddhav thackeray : गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. अखेर या राजकीय नाट्यावर काल पडदा पडला. गेल्या अडीच वर्षांपासून राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकार अखेर कोसळले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (ता.२९) फेसबुक लाईव्हवरुन जनतेशी संवाद साधून राजीनाम्याची घोषणा केली. तसेच त्यांनी आपल्या मंत्र्यांसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेऊन राजीनामा पत्र सुपुर्द केले. यावेळी अनिल परब, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर, अजय चौधरी, निलम गोऱ्हे आदी उपस्थित होते. या राजीनाम्या मनोरंजन विश्वातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. (Kedar Shinde Facebook Post on Maharashtra Politics)

दिग्दर्शक केदार शिंदे कायमच विविध विषयांवर लिहीत असतात.नुकतीच त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी आठवण शेयर केली होती. शिवसेनेच्या उभारणीत आसलेले शाहीर साबळे यांचे योगदान आणि शिवसेनेशी साबळे परिवाराचे असलेले मैत्र त्यांनी स्पष्ट केले होते. काल (बुधवार, २९) उद्धव ठाकरे यांनी मुख्य मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचे ठाकरे परिवारावर असलेले प्रेम पुन्हा दिसून आहे. (kedar shinde shared facebook post After Maharashtra CM uddhav thackeray Resignation)

'तिसरी घंटा झाली.. पडदा सरकला.. नाटक सुरू.. performance तोच!!!!', असे केदार शिंदे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टचा रोख काहीसा भाजप सरकारच्या विरोधात दिसतो आहे. या पोस्टवर अनेकांचे रीप्लाय येत असून 'महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस!', 'जी महाराष्ट्र', 'उद्धव ठाकरे यांना पाठिंबा' अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

काल सर्वोच्च न्यायलयाने या प्रकरणामध्ये रात्री ९ वाजता निकाल देत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर अवघ्या २० मिनिटांमध्ये उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाइव्हवरुन आपण राजीनामा देत असल्याचे कळवले. त्यानंतर विविध स्तरारतून उद्धव ठाकरे यांना समर्थन मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT