Kedar Shinde's Jatra 2(Movie)
Kedar Shinde's Jatra 2(Movie) Google
मनोरंजन

'कोंबडी पळाली...' पुन्हा पडद्यावर! केदार शिंदे घेऊन येतोय 'जत्रा 2'

प्रणाली मोरे

दिग्दर्शक केदार शिंदे(Kedar Shinde)च्या मालिका आणि सिनेमे एकेकाळी प्रेक्षकांसाठी ट्रीट असायचे. आता गेल्या काही वर्षात केदारला त्याच्या कलाकृतींसाठी हवा तसा किंवा पूर्वी मिळायचा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नव्हता. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला होता पूर्वीचा केदार त्याच्या कलाकृतींच्या माध्यमातून कधी दिसणार? अग बाई अरेच्चा,श्रीमंत दामोदर पंत,गलगेल निघाले,खो खो असे सिनेमे,सही रे सही सारखं दमदार नाटक अन् अनेक टि.व्ही वरच्या विनोदी बाजाच्या त्याच्या मालिकांनी त्याचा असा एक चाहतावर्ग निर्माण केला होता. केदार शिंदेची एक खासियत आहे की त्याच्या काही चांगल्या सिनेमांना तो पुन्हा सीक्वेलच्या माध्यमातून लोकांच्या भेटीस आणत आहे. 'अग बाई अरेच्चा २' देखील त्यानं आणला होता. आता त्याचा सुपरहिट 'जत्रा' सिनेमाचा सीक्वेल घेऊन तो भेटीस येत आहे. आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्ताला सोशल मीडियाच्या माध्यामातून त्यानं ही घोषणा केली आहे. कुशल बद्रिकेनंही यासंदर्भात केलेली एक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.

एक मजेशीर टीझर शेअर करीत कुशलनं आपल्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे,''ह्यालगाड आणि त्यालागाडची जत्रा आनंदमयी झाली त्याला १६ वर्षाहून जास्त काळ लोटलाय.. कोंबडी पळून सुद्धा आता बरीच वर्ष झाली आहेत.. पण अजूनही तुमचा ताब्या आमच्या राजुत आहे! म्हणूनच ह्या गुढीपाव्यानिमित्त तुम्हा सर्व रसिकांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन येतोय.. आपलं ठरलय.. तुमच्यासाठीच ठरवल आहे.. आम्ही सगळे मिळून तुमच्यासाठी आनंदाची मेजवानी घेऊन येतोय.. ह्या नवीन वर्षात तुम्हाला हसवायला 'जत्रा 2' येतोय!गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!अलबत्या गलबत्या कोण फोडेल....................''

केदार शिंदे दिग्दर्शित 'जत्रा' हा सिनेमा २००६ साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमात भरत जाधव(Bharat Jadhav),सिद्धार्थ जाधव(Siddhartha jadhav),क्रांती रेडकर(Kranti Redkar) महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारताना दिसले होते. यातील 'कोंबडी पळाली' गाण्याच्या प्रेमात तर बॉलीवूडकरही पडले. थेट कतरीनाच अजय-अतुलच्या बीट्सवर ताल धरुन नाचली होती. फक्त गाण्याचे शब्द होते,'चिकनी चमेली'. तर याच सिनेमातील 'ये गो ये मैना' हे गाणंही लोकांना भुलवून गेलं होतं. यातील संवाद आणि भरत-सिद्धार्थच्या जोडगोळीच्या अभिनयाची चमकनं गेली १६ वर्ष लोकांच्या स्मरणात जत्रा सिनेमाला ठेवलं. त्यामुळेच तर आमच्यासारखे तुम्हीही आतुर असालच केदारच्या 'जत्रा २' साठी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

Anil Kapoor : "सहजीवनाची 51 वर्षं..."; लग्नाच्या वाढदिवसाला अनिल यांची पत्नीसाठी इमोशनल पोस्ट

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

SCROLL FOR NEXT