Ketaki Chitale Marathi celebrity viral video  esakal
मनोरंजन

Ketaki Chitale : 'त्या' महापुरुषाचं म्हणणं काय? नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी केतकीची वादळी पोस्ट!

असो.... २०२४ मध्ये माझी ही इच्छा पूर्ण होईल का, असे म्हणत केतकीनं तिच्या चाहत्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

युगंधर ताजणे

Ketaki Chitale Marathi celebrity viral video : आपल्या परखड आणि सडेतोड वक्तव्यासाठी नेहमीच ओळखल्या गेलेल्या केतकीच्या पोस्टची पुन्हा एकदा चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे. तिनं नव्या वर्षाच्या निमित्तानं शेयर केलेला तो व्हिडिओ नेटकऱ्यांचे, चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे.

केतकीनं त्या पोस्टमधून आपल्यावर दोन वर्षांपूर्वी कशाप्रकारे अन्याय झाला, कशाप्रकारे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आणि ज्यांच्यामुळे ते गुन्हे दाखल झाले त्यांच्याकडून अद्याप कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया कशी समोर आली नाही याबाबत परखडपणे मत व्यक्त केले आहे.

आपल्या पोस्टमध्ये केतकी म्हणते, नमस्कार मी केतकी चितळे, मी हा व्हिडिओ का करते आहे तर प्रत्येक वर्षी म्हणजे नवीन वर्ष आल्यावर आपल्या प्रत्येकाच्या काही ना काही इच्छा असतात. माझीही एक इच्छा आहे. १४ मे २०२२ साली मला बेकायदेशीर अटक करण्यात आली. तुरुंगात टाकण्यात आले हे सर्वांना माहिती आहे. माझ्याविरोधात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रारी नोंदवल्या. माझ्या विरोधात चूकीच्या तक्रारी दाखल केल्या गेल्या. यात जे सेक्शन अस्तित्वातच नाही ते वापरुन माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

बरं ज्या तक्रारी नोंदवण्यात आल्या पोलिसांनी बेकायदेशीररित्या त्याचे एफआयआरही लिहिले. जे सेक्शन १६अ (आयटी) अस्तित्वातच नाही ते लिहिण्यात आले. या सगळ्यात एक व्यक्ती मला दोनशे ठिकाणी फिरवणार होती. पण ती व्यक्ती फारशी महत्वाची नसल्यामुळे आपण त्याच्याबाबत फारसं काही बोलणार नाही.

या सगळ्यात ज्या व्यक्तीच्या नावामुळे, त्यांचे नाव वापरुन मला तुरुंगात टाकण्यात आले त्या व्यक्तीचे म्हणणे काय आहे, त्या महापुरुषाचे म्हणणे काय आहे, हे ऐकायला आणि जाणून घ्यायला मला आवडेल. याबाबत मी समन्सही पाठवले आहे. कोर्टात येऊन तुमची बाजू मांडा, असे त्यात म्हटले आहे. घाबरायचं कशाला, मांडा की स्व:ताचे मत.... या शब्दांत केतकीनं तिच्यावर झालेल्या अन्यायाकडं लक्ष वेधलं आहे.

असो.... २०२४ मध्ये माझी ही इच्छा पूर्ण होईल का, असे म्हणत केतकीनं तिच्या चाहत्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यावर नेटकऱ्यांनी तिला वेगवेगळ्या कमेंट्सही दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

Pune Crime: आषाढी वारीत मुलीवर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, नराधमांना अटक; आरोपी निघाले...

Murud Crime : पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय; नातेवाईकांनी रस्ता अडवला

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

SCROLL FOR NEXT