Ketaki Mategaonkar shared post on shraddha walkar case and request to girls and said believe but dont trust sakal
मनोरंजन

Ketaki Mategaonkar: विश्वास ठेवा पण.. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावर केतकीची पोस्ट

अभिनेत्री केतकी माटेगावकरने मुलींना सूचित करणारी पोस्ट केली आहे.

नीलेश अडसूळ

Ketaki Mategaonkar on shraddha walkar case: सध्या महाराष्ट्राचीच नव्हे तर देशाची झोप उडवणारं 'श्रद्धा वालकर; हत्या प्रकरण समोर आलं आहे. आफताब पूनावाला या तरुणाकडून फसवणूक आणि मग अत्यंत निर्घृणपणे तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा सर्व स्तरातून निषेध केला जात असतानाच अभिनेत्री केतकी माटेगावकर हिने मुलींना जागरूक करणारी एक पोस्ट केली आहे.

(Ketaki Mategaonkar shared post on shraddha walkar case and request to girls and said believe but dont trust)

मूळची वसईची असलेली श्रद्धा प्रियकर आफताब पूनावालाबरोबर आधी नायगाव येथे राहत होती मात्र नंतर ते दिल्लीमध्ये स्थायिक झाले. दिल्लीला गेल्यावर श्रद्धाने त्याच्यामागे लग्नाचा तगादा लावला. या मुद्द्यावरुन त्यांच्यामध्ये वाद झाला. भांडणादरम्यान आफताबने गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे करून 18 दिवस फ्रीजमध्ये ठेवले. दरम्यान तो इतर मुलींशी डेट करत होता. पोलिसांनी आफताबला ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. अशा गुन्हेगाराला काठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्वजण आग्रही आहेत. अगदी सोशल मीडियावरही या प्रकरणावर चर्चा होत आहेत. अनेक कलावंत त्याबाबत व्यक्त होत आहे. आता अभिनेत्री केतकी माटेगावकरने देखील पोस्ट शेअर केली आहे.

आपल्या अभिनयाने आणि गाण्याने सर्वांना वेड लावणारी केतकी म्हणते, ‘एक सुंदर असं जग आपले आई बाबा आपल्याला देतात. सुखसोयींनी, उत्तम आणि सुरक्षित असं.. हे सगळे आपण अनुभवू शकतो कारण समाजातील वाईट गोष्टी आपले पालक आपल्या जगापर्यंत पोहचू देत नाहीत. मात्र आपला एक चुकीचा निर्णय आपले आयुष्य बदलू शकतो. श्रद्धा एक सुंदर तरुण मुलगी.. तिचं नेमकं काय चुकलं? ती प्रेमात पडली, मात्र तिने चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला. काल ही बातमी वाचून माझी झोप उडाली.’

Ketaki Mategaonkar on shraddha walkar case
Ketaki Mategaonkar on shraddha walkar case

पुढे ती म्हणते, 'माझ्या सर्व मैत्रिणींना माझा सल्ला आहे.. कृपया विश्वास ठेवू नका.. अगदी कुणावरच ठेवू नका.. तुम्ही तुमचं भविष्य सुंदर घडवू शकता. अगदी एकट्यानेही.. जगाकडे उघड्या डोळ्यांनी पाहा.. भावनेच्या आहारी जाऊन मूर्ख बनू नका. एकच सांगेन.. विश्वास ठेवा.. पण आहारी जाऊ नका..' तिची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganesh Visarjan 2025 : चाकण परिसरात गणेश विसर्जनाच्या वेळी चार जणांचा दुर्दैवी बळी

PM Modi and Emmanuel Macron: भारताचा दबदबा जागतिक पातळीवर कायम! आता मोदींची फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांशीही चर्चा

Ganpati Visarjan 2025 Live Updates : पावसाच्या सरी असूनही मुंबईत लाखो लोक विसर्जन मिरवणुकीत सामील

भक्ती, उत्साह आणि विरहाचा संगम! मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन, पुणेकरांच्या डोळ्यांत अश्रू, ओठांवर ‘गणपती बाप्पा मोरया’

Latest Maharashtra News Updates : इचलकरंजीत सकाळ माध्यम समुहातर्फे तंदुरूस्त बंदोबस्त उपक्रम

SCROLL FOR NEXT