Yash Birthday Accident:  esakal
मनोरंजन

Yash Fan Death: KGF स्टार यशच्या आणखी एका चाहत्याचा मृत्यू! कर्नाटकात भेटण्याचा प्रयत्न करत असताना कारला धडकला

यशच्या आणखी एका चाहत्याचा कार अपघातात मृत्यू झाला.

Vaishali Patil

Yash Fan Death: साउथचा सुपरस्टार अभिनेता यशला वेगळ्या ओळखीची गरज नाही. KGF Chapter 2 च्या यशानंतर, तो केवळ कन्नडमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतात ओळखला जातो. यशची फॅन फॉलोइंग खूप मजबूत आहे. मात्र त्याचा हाच चाहता वर्ग त्याच्यासाठी अडचणीचा ठरत आहे.

8 जानेवारीला यशच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करताना त्याच्या तीन चाहत्यांचा मृत्यू झाला. हा एक दुःखद अपघात होता. कटआऊट लावताना विजेचा धक्का लागल्याने यशच्या तीन चाहत्यांचा मृत्यू झाला होता.

या अपघातानंतर यशने मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत करणार असल्याचे आश्वासन दिले. इतकेच नाही तर चाहत्यांना आपली काळजी घेण्याचे आवाहनही केले होते. मात्र त्यातच आणखी एक वाईट घटना घडली आहे. यशच्या आणखी एका चाहत्याचा कार अपघातात मृत्यू झाला.

मिडिया रिपोर्टनुसार, यशच्या एका चाहत्याचा अपघातात मृत्यू झाला. तो यशला कर्नाटकला भेटण्यासाठी जात होता. यादरम्यान कर्नाटकातील मुलगुंड येथे त्यांची दुचाकी पोलिसांच्या वाहनाला धडकली आणि हा अपघात झाला. त्यांना तातडीने गडग इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला.

निखिल गौडा भीमनगौडा गौडर असे त्याचे नाव होते. 22 वर्षीय निखिल बिनकडकट्टी गावातील रहिवासी होता. आत्तापर्यंत यशने या चाहत्याच्या निधनावर कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही. मात्र बातमी यशसाठी नक्कीच धक्कादायक असणार आहे.

यशच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो शेवटचा KGF 2 मध्ये दिसला होता. आता चाहते KGF चॅप्टर 3 आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचे दोन्ही भाग संपूर्ण भारतात ब्लॉकबस्टर ठरले.

आता तो लवकरच गीतू मोहनदासच्या टॉक्सिक: अ फेयरी टेल फॉर ग्रोन अप्स चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत साई पल्लवी दिसणार होती मात्र आता यासाठी करीना कपूर खानच्या नावाची चर्चा आहे.

यासोबतच तो नितीश तिवारी यांच्या 'रामायण'मध्ये रावणाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT