khalnayak team reunites for subhash ghai wedding anniversary madhuri dixit sanjay dutt
khalnayak team reunites for subhash ghai wedding anniversary madhuri dixit sanjay dutt  SAKAL
मनोरंजन

Khalnayak Reunion: खलनायकचा सिक्वेल येणार? ३० वर्षांनी एकत्र आले कलाकार, हे ठरलं खास कारण

Devendra Jadhav

संजय दत्त, माधुरी दीक्षितचा खलनायक सिनेमा चांगलाच गाजला. आजही हा सिनेमा आवडीने पाहिला जातो. माधुरी दीक्षीत - संजय दत्त यांचा हा सिनेमा अजुनही काही जणांच्या वॉचलिस्टमध्ये नक्कीच असेल.

याच खलनायक सिनेमाचे कलाकार ३० वर्षांनी एकत्र आले आहेत. कारण सुद्धा खास ठरलंय. जाणुन घ्या सविस्तर.

(khalnayak team reunites madhuri dixit sanjay dutt)

या खास कारणाने खलनायकचे कलाकार आले एकत्र

खलनायक सिनेमाचे कलाकार एकत्र का आले असतील असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो.

चित्रपट निर्माते सुभाष घई आणि त्यांची पत्नी मुक्ता घई यांनी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुंबईत डिनर पार्टीचे आयोजन केले होते. त्यानिमित्ताने घईंच्या घरी खलनायक सिनेमाचे कलाकार माधुरी दीक्षित, संजय दत्त, जॅकी श्रॉफ आणि अनुपम खेर यांनी हजेरी लावली होती.

माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने सुद्धा यावेळी उपस्थित होते. या सर्वांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.

सर्व कलाकारांना एकत्र पाहुन चाहत्यांनी केली खलनायक 2 ची मागणी

कलाकारांनी फोटो पोस्ट केल्यानंतर खलनायक 2 भेटीला येणार असा अंदाज चाहत्यांनी लावायला सुरुवात केली.

एकाने फोटोवर कमेंट केली, “खलनायक टीम एक साथ. मला वाटतं खलनायक 2 भेटीला येत आहे,” आणखी एकाने कमेंट केली की, "खलनायक 2 लवकरच येणार वाटतं."

अशाप्रकारे फॅन्सनी या सर्व कलाकारांना एकत्र पाहुन खलनायक 2 चा अंदाज लावलाय.

खलनायक सिनेमाची तीस वर्षे

खलनायक हा सुभाष घई यांच्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. माधुरी आणि नीना गुप्ता यांचे चोली के पीचे क्या है हे गाणं खलनायकचे एक वैशिष्ट्य होते.

2020 मध्ये, सुभाष घई यांनी मुंबई मिरर दिलेल्या मुलाखतीत पुष्टी केली होती की, खलनायकचा सिक्वेल पाइपलाइनमध्ये आहे. त्यामुळे येत्या काही काळात खलनायक 2 येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT