Shweta Tiwari  Team esakal
मनोरंजन

अभिनेत्री श्वेता तिवारी रुग्णालयात दाखल

श्वेताच्या चाहत्यांनी व्यक्त केली तिच्या आरोग्याविषयी काळजी

स्वाती वेमूल

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री आणि खतरों के खिलाडी ११ Khatron Ke Khiladi 11 ची स्पर्धक श्वेता तिवारीला Shweta Tiwari रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, रक्तदाब कमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. श्वेताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हातातील एका पुस्तकाचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तिच्या हातावर सलाइन पहायला मिळतेय. यावरून श्वेताच्या चाहत्यांनी तिच्या आरोग्याविषयी काळजी व्यक्त केली आहे. "गेल्या काही दिवसांपासून कामाचं व्यग्र वेळापत्रक असल्याने श्वेताना पुरेसा आराम करता आला नाही. सतत प्रवास, शूटिंग आणि बदलत्या हवामानाचा तिच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे", अशी माहिती श्वेताच्या टीमने 'इंडियन एक्स्प्रेस'शी बोलताना दिली.

श्वेताला रुग्णालयात दाखल केल्याचं कळताच तिचा पूर्वाश्रमीचा पती अभिनव कोहली याने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. 'मला माझ्या मुलाच्या भेटण्याची परवानगी देण्याचा वाद एकीकडे आहे, पण मी देवाकडे प्रार्थना करेन की श्वेता लवकरात लवकर बरी व्हावी. बिचारे कलाकार, सर्वांसमोर सुंदर दिसण्यासाठी, प्रेक्षकांचं प्रेम मिळवण्यासाठी, गरजेपेक्षा जास्त बारीक होण्याचा प्रयत्न करतात, कमीत कमी जेवण जेवतात आणि अशा गोष्टींमुळे एके दिवशी त्यांचं शरीर दमून जातं', अशी पोस्ट लिहित अभिनवने श्वेताला टोला लगावला आहे.

खतरों के खिलाडी ११ या रिअॅलिटी शोच्या शूटिंगनिमित्त श्वेता दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनला गेली होती. श्वेता आणि अभिवन कोहलीचा वाद सर्वश्रुत आहे. श्वेता मुलाला भेटू देत नसल्याची तक्रार अभिनवने केली आहे. गेल्या दोन दशकांपासून श्वेता मनोरंजनविश्वात काम करतेय. 'कसौटी जिंदगी की' या मालिकेत प्रेरणाची भूमिका साकारत ती घराघरात पोहोचली. ती बिग बॉसच्या चौथ्या सिझनची विजेती ठरली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT